शिक्षक भरती: पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती करण्याची केसरकरांनी केली घोषणा..


💁🏻‍♂️ राज्यातील शिक्षक भरती कधी होणार असा सवाल उपस्थित करुन सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधत शिक्षकभरती संदर्भात मोठी घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाण्याची घोषणा केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

💯 *टक्के शिक्षक भरती होणार...*
शिक्षक भरती संदर्भात दीपक केसरकर म्हणाले, नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षक भरती करण्याचा आमचा विचार आहे. पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. मात्र, विद्यार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीचा आकडा कळेल. शंभर टक्के शिक्षक भरती होणार आहे असंही केसरकर म्हणाले.

📌 *आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असं नाही; मात्र..!* 
माध्यमिक शिक्षकांनुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सुद्धा रद्द करता येतील का? जेणेकरुन शिक्षक स्थिर होतील याबाबत मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करणार असल्याचं केसरकर यांनी सांगितले. याचवेळी त्यांनी प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असं नाही, मात्र जवळच्या गावात पोस्टिंग देता येईल का याचा विचार आम्ही करत असून शिक्षकांच्या बदलीसंदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं.