ब्रेक मारतच दुचाकी आदळली,3 जखमीगडचिरोली :-M H - 3 I FU 4 9 94 नंबरची फोर व्हिलर गडचिरोली वरून आरमोरी कडे जात होती. तर टु व्हिलर गाडी नं. 3 4 A 1508 क्रंमाकाची गाडी फोर व्हिलर च्या मागे होती. कारने मागे न पाहाता ब्रेक मारल्या मुळे मागुन येणारी टुव्हिलर वाल्याची गाडी फोर व्हिलरला मागे आदळल्यामुळे गाडीचा मागचा काच व पुढचा आरसा फुटला तर टु व्हिलरवर बसलेले तिघेही जन पडले एकाला गंभीर मार असुन एक महिला व मुलगा यांना थोडी दुखापत झाली.

आज दि. २ मे सायंकाळी ५.३० चे सुमारास कारवाला आरमोरी कडे जात होता तर टु व्हिलर वाले त्याला मागुन जात होते . खरपुडी नाक्याजवळ सदर अपघात घडला. टु व्हिलर वाले लालाजी दिवटे ५५ पत्नी उर्मिला दिवटे ,मुलगा रंजित राहणार जलसाई मुडझा ( ब्रम्हपुरी ) हे तिघेजन इंदिरानगर लग्न आटपून खरपुडी गावाला आपल्या नातेवाईकाना भेटुन पुन्हा मुडझा जाणार होते. फोर व्हिलर वाल्यांनी जखमीना डॉ. कुंभारे यांच्या दवाखाण्यात भरती केले. बघ्याची गर्दी जमली होती. गडचिरोली पोलिसांना फोन केला होता . तोपर्यंत कार वाल्यांनी जखमींना खाजगी दवाखान्यात भरती केले. लालाजी दिवटे हा गंभीर जखमी आहे.