गडचिरोली : १३ ते १८ या कालावधीत मुलगा व मुलीत अनेक शारीरिक व मानसिक बदल घडू येतात. भावनेच्या आहारी जाऊन व्यावहारिकता समजत नाही. त्यामुळे अल्पवयातच मुलासोबत पळून जाण्याच्या घटना घडतात. गडचिरोली जिल्ह्यात वर्षभराच्या कालावधीत विविध पोलिस स्टेशनमध्ये मुली गायब झाल्याच्या १०० पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
१८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीला अल्पवयीन मुलगी संबोधले जाते. अल्पवयीन असताना मुलासोबत मुलगी स्वतःहून पळून जरी गेली असली तरी मुलाविरोधात तिचे अपहरण केल्याचा गुन्हा नोंद केला जाते. पोलिस मुलीचा शोध घेऊन मुलीला वडिलाकडे सुपुर्द करतात. यामुळे मुलाचे आयुष्य बर्बाद होते. अल्पवयीन मुलीचे अपहरण हा गंभीर गुन्हा माणून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होतो.
लेकरांच्या मायही गायब
प्रेम हे आंधळे असते, असे मानले जाते. प्रेमाला वयाचे बंधन नाही. दोन लेकरांच्या मायही प्रियकरासोबत पळून जातात. दिवसेंदिवस लग्न झालेल्या महिलासुद्धा प्रियकरासोबत पळून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.
मुला-मुलीशी मैत्रीपूर्ण वागा
१८ व्या वर्षापर्यंत मुलीमध्ये अनेक शारीरिक व मानसिक बदल घडून येत असतात. कधी कधी मुलीमध्ये चिडचिडपणा वाढलेला असतो. आपल्यासोबत एखाद्या व्यक्तीने मैत्री करावी, असे तिला नेहमी वाटत असते. ही जागा पालकांनी भरून काढली तर मुलगी चुकीचे पाऊल उचलणार नाही. वयानुसार मुलीमध्ये होणाऱ्या बदलांविषयी पालकांनी जागरूक असावे. तिला घरीच प्रेम मिळाले तर ती बाहेरचे प्रेम शोधण्याचा प्रयत्न करणार नाही.
पोक्सो कायद्यांतर्गत होते कारवाई
अल्पवयीन मुलीला पळवून नेल्यास मुलावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाते. या कायद्यांतर्गत संबंधित मुलाला पाच वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.