जात प्रमाणपत्र पडताळणी करीता ऑनलाईन वेबीनार (Webinar) आयोजन करणेबाबतगडचिरोली,(जिमाका)दि.12: सामाजिक न्याय विभागाने दिनांक 01.04.2023 ते 01.05.2023 या कालावधीमध्ये “सामाजिक न्याय पर्व” अंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्याचे निशचित केले आहे. त्या अनुषंगाने जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रप्क्रिये संदर्भात माहिती गडचिरोली जिल्हयातील सर्व लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी ऑनलाईन वेबीनारचे (Webinar) आयोजन करणेबाबत आयुक्त, समाज कल्याण, म.रा.पुणे, व मा.महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी निर्देश दिलेले आहे.गडचिरोली जिल्ह्रयातील उमेदवारांना सदरचे ऑनलाईन वेबीनार (Webinar) बाबत जनजागृती व्हावी, जेणे करुन सर्वसामान्य लोकांपर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी बाबतची माहिती (उदा. अर्ज कोणत्या प्रकारे करावे, कोणत्या प्रकारचे दस्ताऐवज जोडावे इ.) मिळावी व अर्जदारास अर्ज सादर करताना ऑनलाईन सुविधेचा अचुकपणे/प्रभावीपणे वापर करणे शक्य होईल.त्यानुषंगाने समितीस्तरावर ऑनलाईन वेबीनारचे (Webinar) आयोजन दिनांक 13/04/2023 रोजी दुपारी 01.00 वाजता करण्यात आलेले आहे, याबाबत अधिकाधिक कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय प्राचार्य, अर्जदार, पालक व विद्यार्थी यांना सदरच्या जिल्हास्तरीय वेबीनारचे (Webinar) सहभगी होण्याचे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली यांनी केले आहे. वेबीनारची (Webinar) लींक पुढील प्रमाणे आहे. (Google Meet) :- Thursday, Apr13 · 01:00 -02:00PM Video call link (ID):- https://meet.google.com/phz-acuf-dgd 

                                                                   ******

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत
 प्रोत्साहनपर लाभ योजना शेतकरी आधार प्रमाणीकरण करणेबाबत जाहीर आवाहन
 
 गडचिरोली,(जिमाका)दि.12: महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेबाबत दिनांक 29 जुलै 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. सन 2017-18, सन 2018-19 व सन 2019-20 या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त़ रु. 50 हजार रुपये पर्यंत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. या तीन वर्षापैकी शेवटच्या वर्षात जे कर्ज घेतलेले आहे. त्या वर्षाच्या कर्जाची मुददल रक्क़म विचारात घेतली जाणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्हयातील जिल्हा मध्य़वर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत व खाजगी बँका यांनी या योजनेत पात्र असलेल्या खातेदारांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरलेली आहे. या योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची विशिष्ट़ क्रमांकासह (V-K लिस्ट़) आजपावेतो एकुण 5 यादया प्रसिध्द झालेल्या असुन, विशिष्ट़ क्रमांकासहची यादी संबंधीत बँका, जिल्हा उपनिबंधक,व तालुका सहाय्य़क निबंधक कार्यालयात तसेच गाव चावडी, ग्रामपंचायत, विकास संस्था येथे प्रसिध्द़ करण्यात आलेली आहे. विशिष्ट़़ क्रमांकासह यादी प्रसिध्द़ झाल्यानंतर त्यातील शेतकऱ्यांनी संबंधीत बँकेत किंवा सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणिकरण करावयाचे आहे.आधार प्रमाणिकरणानंतर पात्र लाभार्थ्यांची प्रोत्साहनपर लाभाची रक्क़म त्यांच्या बँकेच्या सेव्हिंग खात्यावर जमा होणार आहे. आधार प्रमाणिकरणासाठी गेल्यानंतर त्यांचा आधार क्रमांक किंवा त्यांच्या कर्जाची रक्क़म चुकली असेल, तर त्याबाबत त्या शेतकऱ्याने तशी तक्रार संबंधित पोर्टलवर नोंदवावयाची आहे, अशा प्राप्त़ होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या तर तालुकास्त़रावर संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तरी आज रोजी गडचिरोली जिल्हयातील तालुकानिहाय अहेरी 35, आरमोरी 45, भामरागड 13, चामोर्शी 85,देसाईगंज 35, धानोरा 13, एटापल्ली 15, गडचिरोली 37, कोरची 2, कुरखेडा 22, मुलचेरा 39 व सिरोंचा 48 असे एकुण 388 शेतकरी लाभार्थी यांनी आधार प्रमाणिकरण करणे शिल्लक आहे. तरी सदर तालुक्यातील लाभार्थी यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणिकरण करुन घेणे आवश्य़क असल्याने तालुक्यातील आपले सरकार/सी.एस.सी सेंटर/संग्राम केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. असे जाहिर आवाहन जिल्हाधिकारी, गडचिरोली व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, गडचिरोली यांनी केलेले आहे.
****

17 एप्रिल रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

गडचिरोली,(जिमाका)दि.12: समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी /अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवून करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनासाठी शासनाने महिला लोकशाही दिवस साजरा करणेकरीता सुचित केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारला जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येते. दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी सोमवार सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या दालनात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे.या महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी असे प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत.तरी ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार,निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असतील अशा महिलांचे अर्ज विहीत नमुण्यात दोन प्रतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे स्विकारण्यात येईल. 
     जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनामध्ये तक्रार अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली,बॅरेक क्र.1 खोली क्र.26 व 27, कलेक्टर कॉम्प्लेक्स ता.जि. गडचिरोली या कार्यालयात निशुल्क उपलब्ध होईल याची नोंद घ्यावी, असे सदस्य सचिव, महिला लोकशाही दिन तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
****