TIP मुळे विद्यार्थी गुणवत्तेत वाढ होत आहे- केंद्रप्रमुख मन्साराम मेश्राम

    (गट्टा येथील सिखे शिक्षण उत्सव मध्ये सहा शाळा सहभागी)     पेंढरी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गट्टा येथे दिनांक 31 मार्च 2023 रोजी शुक्रवार ला सिखे शिक्षण उत्सव साजरा करण्यात आला. मागील दोन वर्षांपासून धानोरा तालुक्यामध्ये TIP हा कार्यक्रम सिखे संस्था मुंबई, शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांच्या संयुक्त समन्वयातून राबविला जात आहे.
  सिखे शिक्षण उत्सव 2023 मध्ये मुलांनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तू जसे की कागदापासून, मातीपासून, विविध साहित्याचा वापर करून तयार केलेल्या वस्तूंचा बाजार भरविण्यात आला. यामध्ये शाळेतीलच काही विद्यार्थी दुकानदार होऊन वस्तूंची विक्री करत होते तर त्यामधीलच काही विद्यार्थी हे ग्राहक होऊन वस्तूंची खरेदी करत होते. यासाठी कागदी नाणी-नोटांचा वापर करून प्रत्यक्ष व्यवहार, देवाणघेवाण कशी केली जाते याचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्यास मिळाला. मागील वर्षभरापासून चाललेल्या वस्तूगप्पा, चित्रगप्पा याद्वारे मुलांना बोलके करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचेच एक फलित म्हणजे पेंढरी केंद्रातील या प्रदर्शनीमध्ये सहा शाळांचा सहभाग होता. मुले स्वतः तयार केलेल्या वस्तूबाबत माहिती देत होते, त्याबाबत आपले मत प्रकट करत होते.      या कार्यक्रमाला मन्साराम मेश्राम केंद्रप्रमुख केंद्र पेंढरी, शाळा व्यवस्थापन समिती गट्टा चे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इतर सर्व सदस्य, गोटा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपस्थित झालेले होते. तसेच या अनोख्या कार्यक्रमाला गावातील लोकांचा सुध्या मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. मुलांच्या भावविश्वाशी सांगड घालून TIP कार्यक्रम विद्यार्थ्यांना बोलके करण्याचा, मुलांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याचं काम करत आहे. यामुळे मुले बोलकी होण्यास, अभिव्यक्त होण्यास, भाषेची विविध संकल्पना समजून घेण्यास, भाषा विकास करण्यास नक्कीच मदत होत आहे असे मत केंद्रप्रमुख मेश्राम यांनी मांडले. तसेच मुलांचे व्यवहार पाहून, त्यांची देवाणघेवाण पाहून पालक सुध्या खूप आनंदीत दिसून येत होते. 
     या सिखे शिक्षण उत्सव कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन गट्टा शाळेचे मुख्याध्यापक विनोद रायपुरे आणि अनिता बलगुजरवार मॅडम यांनी केले होते. यामध्ये सहभागी शाळेचे मिरा सातपुते मॅडम, सावित्रा उईके मॅडम, भोजराज किरमे सर, नरेंद्र खेवले सर, पदा सर, ज्ञानदेव बोरकर सर, प्रभाकर येरमे सर, पदा सर या सर्व शिक्षकांनी महत्वाची भूमिका होती. तसेच सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिखे संस्थेचे मार्गदर्शक म्हणून धनराज कोहळे यांनी मोलाची भूमिका पार पाडली. वरील कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना आपापसात झालेली देवाण घेवाण याविषयी चर्चा करण्यात आली. त्यांनी कोना सामान खरेदी केला तसेच कोणता सामान विक्री केला याविषयी सुध्या विद्यार्थ्यांना माहिती विचारून त्यांच्या ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.