वन विभागात OWR चे काम केलेल्या मजुरांना योग्य मजुरी मिळवून देण्याची मागणी..!!*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना मजुरांनी दिले निवेदन*

आल्लापल्ली वनविभागात माहे डिसेंबर2022 ते फेब्रुवारी 2023 असे तीन महिने OWR चे काम केलेल्या मजुरांना वनविभागाचे नियमानुसार ठरवून दिल्याप्रमाणे मजुरी न देता फक्त रोजी 380 रु.देऊ असे संबंधित वनरक्षकाने मजुरांना सांगितल्याने वनविभागाचे नियमानुसार रोजीचे मजुरी आणि वनरक्षकाने सांगितलेली मजुरीत खूप मोठा फरक असल्याने तीन महिने काम केलेल्या मजुरांनी आविस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी येथील कार्यालयात भेट घेऊन OWR या कामाचे वनविभागाचे नियमानुसार ठरवून दिल्यानुसार मजुरी मिळवून देण्याची निवेदनातून मागणी केली आहे.यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा करून यात योग्य तोडगा काढून वनविभागाचे नियमानुसारच मजुरी मिळवून देण्याचे प्रयत्न करू,असे आश्वासन संबंधित मजुरांना दिली..!!

यावेळी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांना रमेश ओघालू डोके,बाबुराव चौधरी,राकेश कुळमेते, अशोक चौधरी,रामदास चौधरी,सुधाकर तुमळे, मनोज भोयर,प्रभाकर चौधरी,विजय चौधरी,सतीश बोरकुट,प्रकाश राऊत,संतोष येलूर,कृष्णकांत जणकापुरे,महेश भोयर,श्रीनिवास येलूर,सुनील चौधरी,महेश भोयर,रामलू चौधरी, विनोद भोयर आदी मजुरांनी निवेदन दिले..!!