डॉ.बाबासाहेब आंबडेकर जयंतीनिमित्त CM केसीआर राव यांनी केले बाबासाहेबांच्या 125 फूट पुतळ्याचे अनावरण



तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर रावच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री कडियाम श्रीहरी गरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्या समितीने निश्चित केलेल्या निकषांनुसार बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

Ambedkar Jayanti :
बाबासाहेब आंबेडकर

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी हैदराबादमधील एनटीआर गार्डनमध्ये डॉ भीमराव आंबेडकर यांच्या 125 फूट उंच पुतळा बसवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ९८ वर्षीय मूर्तिकार पद्म भूषण राम वनजी सुतार कृष्णा यांना यावेळी बोलवण्यात आले होते. यावेळी त्यांचा सत्कार ही करण्यात आला.


मुख्यमंत्री केसीआरच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री कडियाम श्रीहरी गरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा एनटीआर गार्डन परिसरात उभारण्याचा निर्णय घेतला. डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या १२५ फूट उंच पुतळ्याच्या उभारणीसाठी विविध संस्थांकडून माहिती संकलित करण्यात आली. शासनाने 16 सप्टेंबर 2020 रोजी प्रकल्पासाठी 146.50 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आणि निविदा मेसर्स केपीसी प्रोजेक्ट्स लिमिटेड, हैदराबादला देण्यात आली.

काय म्हणतात मुख्यमंत्री



तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले की, केवळ दलित, आदिवासी, बहुजनच नव्हे तर भारतातील लोकांना जिथे जिथे भेदभावाचा सामना करावा लागला. पण बाबासाहेबांमुळे त्यांना आता सन्मान मिळाला. त्यांच्यासाठी आपण जे काही करू ते कमीच आहे. आता सरकार राज्य सचिवालयाला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणार आहे.

ही आहेत वैशिष्ट

पेडेस्टल उंची: 50 फूट
मूर्तीची उंची: 125 फूट
पेडेस्टल स्ट्रक्चरमध्ये बिल्ट-अप एरिया:
तळमजला : 2066 Sq.ft
टेरेस फ्लोअर : 2200 Sq.ft
इमारतीचे बांधलेले क्षेत्रः ६७९२ चौ.फूट
एकूण बांधलेले क्षेत्रः 26258 चौ.फू.
मेमोरियल बिल्डिंगमधील सुविधा:
बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचे प्रदर्शन करणारे संग्रहालय आणि गॅलरी.
लँडस्केप आणि हिरवळ: 2.93 एकर
अंदाजे 450 कारसाठी पार्किंग.
लिफ्टची प्रवाशी क्षमता 15
पुतळ्याचा आर्मेचर स्ट्रक्चरमध्ये वापरलेले स्टील : 360 एमटी