म्हणून ‘ त्याने चक्क बायकोवर बलात्कार करण्याची परवानगी मित्राला दिली , दोघेही गजाआड


देशात रोज अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असतानाच अशीच एक घटना जयपूर इथे उघडकीस आली आहे. आपल्या मित्राकडून 500 रुपये घेऊन पत्नीवर बलात्कार करण्याची परवानगी एका पतीने दिली. पैशांची गरज असल्यामुळे या नराधम पतीनं आपल्या मित्राकडून 500 रुपये घेतले आणि त्या मोबदल्यात आपल्या पत्नीचा ताबा त्याच्याकडे दिला. पैसे दिलेले असल्याने त्या मित्राने जोर जबरदस्ती करत तिला निर्जन स्थळी नेले आणि बलात्कार केला. आपल्यासोबत झालेल्या या प्रकाराने महिला हादरून गेली आणि तिने पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने या प्रकाराला वाचा फुटली.

उपलब्ध वृत्तानुसार, राजस्थानमधील शेखावाटी परिसरात राहणारा तरुण आपल्या पत्नीला घेऊन गावाबाहेरच्या एका हॉटेलात गेला होता.. हॉटेलमध्ये ते दोघे असताना त्याने आपल्या मित्राला बोलावून घेतले . सोनू शर्मा असे या मित्राचे नाव असून तो हॉटेलमध्ये आला आणि तिथे त्याने महिलेच्या पतीकडून ५०० रुपये घेतले . ५०० रुपये हातात आल्यावर पतीने धमकी देत बायकोला त्याच्यासोबत जाण्यास सांगितले.सोनूने त्यानंतर मित्राच्या पत्नीला गावाबाहेरील निर्जन ठिकाणी नेत तिच्यावर बलात्कार केला.

आपल्या पतीकडून झालेला विश्वासघात आणि त्याच्या मित्राकडून झालेला बलात्कार महिलेला सहन झाला नाही आणि तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पती आणि मित्राविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोघांनाही अटक केली. पोलिसांनी या प्रकरणातील शक्य ते सर्व पुरावे गोळा केले आहे. बलात्कार करताना आरोपीनं वापरलेल्या गर्भनिरोधक साधनांपासून ते महिलेच्या वेगवेगळ्या तपासण्यांपर्यंत अनेक बाबींचा समावेश आहे. दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.