पोलीस चकमकीत दोन महिला नक्षली ठार

- प्रत्यकी 14 लाख रुपयांचे बक्षीस होते जाहिर


दिनेश बनकर कार्यकारी संपादक

बालाघाट, 22 एप्रिल : मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हयातील गठी पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या कडला जंगल परिसारात शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या चकमकीम दोन महिला नक्षलीस ठार करण्यात पोलीसांना यश आले आहे. ठार झालेल्या दोघी महिला नक्षलीवर प्रत्येकी 14 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

सुनिता आणि सरिता असे ठार झालेल्या महिला नक्षलीची नावे आहेत. सुनीता ही टाडा दलमच्या भोरम देव एरिया कमांडर होती, ती सध्या विस्तार दलममध्ये काम करत होती तर सरिता ही नक्षली कबीरची रक्षक होती ती खटया मोचा दलममध्ये कार्यरत होती, ती सुध्दा विस्तार दलमध्ये सक्रिय होती अशी माहिती आहे.

दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले असुन पोलीसांनी दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. घटनेनंतर बालाघात पोलिसांनी जंगल परिसरात तीव्र शोधमोहीम सुरु केली आहे.