वंचित बहुजन आघाडी तालुका आरमोरी च्या वतीने आरमोरी येथील अरसोडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त "उजळली धम्मज्योत भीमस्वरांची " प्रबोधनत्मक संगीतमय कार्यक्रम


वंचित बहुजन आघाडी तालुका आरमोरी च्या वतीने आरमोरी येथील अरसोडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त "उजळली धम्मज्योत भीमस्वरांची " प्रबोधनत्मक संगीतमय कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित वंचित बहुजन आघाडी तालुकाघ्यक्ष राजेंद्र गेडाम, उपाध्यक्ष विकास भैसारे, जिल्हा महिला संघटिका प्रज्ञा निमगडे, संध्या रामटेके सदस्य, वैशाली रामटेके सदस्य, कार्यक्रमाचे उदघाटक पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे, प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळ आरमोरी चे सचिव किशोर सहारे, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आरमोरी चे प्राध्यापक विनोदजी शेंडे, प्रमुख पाहुणे डॉ. कल्याणी उंदीरवाडे, विवेक उंदीरवाडे व अरसोडा येथील समस्त नागरिक उपस्थित होते


प्रज्ञा निमगडे जिल्हा महिला संघटिका
वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी