अपघातात ब्रह्मपुरी येथील एकाच बडोले परिवारातील चार जण ठार


ब्रह्मपुरी : आपल्या संपूर्ण परिवारासह आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी स्वतःच्या मालकीच्या गाडीने मध्यप्रदेशातील बैहर येथील कुमादेही येथे जात असताना दुचाकी स्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात किरणापूर नजिक नेवरागाव कला येथे कारला अपघातात होऊन ब्रह्मपुरी येथील एकाच कुटुंबातील तिघांना जागीच मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान आणखी एक जण दगावल्याने मृत्यूची संख्या 4 झाली आहे. दोन चिमुकले गंभीर जखमी असून गोंदिया येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने ब्रह्मपुरी येथे शोककळा पसरली आहे.

ब्रह्मपुरी येथील श्रीनगर कॉलनीतील सेवानिवृत्त बसचालक विजय गणपत बडोले हे आपल्या परिवारासह 16 एप्रिलला स्वतःच्या कारने मध्य


प्रदेशातील बैहर येथील कुमादेही येथे जात होते. किरणापूर नजिक नेवरागाव कला येथे एका दुचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडाला जाऊन जबर धडक दिली. या धडकेत

पत्नी कुंदा बडोले (52), मुलगा गिरीश बडोले (32) विवाहित मुलगी मोनाली चौधरी (बडोले) यांचा जागीच मृत्यू झाला. तर वाहन चालक सेवानिवृत्त विजय बडोले, सून बबिता बडोले आणि दोन लहान चिमुकले नातवंड हे गंभीर जखमी झाले.

गंभीर जखमीला गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र दि. 17 एप्रिलला उपचारादरम्यान विजय पडोले यांनीही गोंदिया रुग्णालयात आपले प्राण सोडले.

कुंदा बडोले, मुलगा गिरीश बडोले व विवाहित मुलगी मोनाली चौधरी (बडोले) या तीनही मृतकाचे शवविच्छेदन करून त्यांचे मृतदेह ब्रह्मपुरी येथे आणले. रविवारी रात्री 11 वाजता त्यांच्या पार्थीवावर अंत्य संस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील चार लोकांचा मृत्यूने शहरात शोककळा पसरली आहे. या अपघातात विजय बडोले, यांची सुन वाहनांमध्ये एकाच परिवारातील व तिचे मुले आणि मुलीचे दोन एकूण सहा जण प्रवास करीत होते. लहान मुले वाचली आहे.