घरासमोर लावली पाटी, आरोपी महिलेवर गुन्हा दाखल
नागपूर : नागरिकांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. पार्श्वभूमीवर नागपुरातील जुना सक्करदरा येथील विश्वशांती बुद्ध विहाराजवळसुद्धा डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. परंतु, यादरम्यान वस्तीतील एका महिलेने आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर 'दलित लोकांनी घराच्या आत प्रवेश करू नये' या आशयाची पाटी लावली. यासह राष्ट्रीय चिन्ह 'अशोक चक्र' असलेला निळा
झेंडा सुद्धा फाडला.
त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना पुरोगामी राज्याला काळिमा फासणारी ठरली. सदर प्रकरण सक्करदरा पोलिसांनी गंभीरतेने घेतले. तसेच आरोपी महिलेविरुद्ध कडक अशा विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.
अमिता जैस्वाल (३८) असे आरोपी महिलेचे नाव आहे. निखिलेश ऊर्फ सोनू दीपक गौरखेडे (३२) असे फिर्यादीचे नाव आहे. गौरखेडे हे अनुसूचित जाती प्रवर्गात मोडतात. प्राप्त माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी सकाळी ९ च्या सुमारास आरोपी अमिता जैस्वाल यांनी आपल्या घरासमोर 'दलित लोकांनी आपल्या घराच्या आत प्रवेश करू नये'. या आशयाची पाटी लावली. तसेच महिलेच्या घरासमोर निळ्या रंगाचा कापडी राष्ट्रीय चिन्ह 'अशोक चक्र'
असलेला झेंडा फाटलेल्या अवस्थेत पडलेला दिसला. हा सर्व प्रकार वस्तीतील शुभम शेंडे, रूपेश फुलझले, शुभांगी फुलझेले, भारती धनविजय व इतर लोकांनी बघितला. त्यानंतर वस्तीत एकच गोंधळ उडाला. मात्र सक्करदरा पोलिसांना कौशल्यपूर्णरित्या परिस्थिती
हाताळली. याप्रकरणी फिर्यादी गौरखेडे यांच्या तक्रारीवरून आरोपी महिला अमिता जैस्वाल हिच्याविरुद्ध अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता १९६० अन्वये कलम २९५ (अ), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ कलम ३ (अ) (टी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त करीत