युकाँच्या तालुका उपाध्यक्षपदी ग्रा.पं.सदस्य सयाम


दिनेश बनकर कार्यकारी संपादक 

*देसाईगंज* -
तालुक्यात युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ता जोडो अभियान सुरू असुन मागील आठवडयात युकाँने अनेकांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आली. आता पुन्हा एकदा युवक कॉंग्रेसने तालुका उपाध्यक्ष पदावर एकलपुर येथील ग्राम पंचायत सदस्य देवनाथ सयाम यांची नियुक्ती केली. तर महासचिवपदी संजय कुकडकार पोटगांव, सहसचिव अंकित मेश्राम विहीरगांव, लालाजी दोनाडकर चिखली/रीठ, तालुका सरचिटणीस अक्षय दामले विठ्ठलगांव, अमोल सोनपिपरे पोटगांव, यादव पारधी सावंगी आदींची नियुक्ती युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष पंकज चहांदे यांनी माजी उपसरपंच नरेंद्र गजपुरे, युकाँचे शहर अध्यक्ष विक्की डांगे, युकाँचे माजी शहरअध्यक्ष पिंकु बावणे, विसोरा- आमगांव गटाचे निरीक्षक टिकाराम सहारे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र दिले.
      सर्व नवनियुक्ती पदाधिकाऱ्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय युकांचे जिल्हाध्यक्ष लारेन्स गेडाम, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी आ. आनंदराव गेडाम, विधानसभा अध्यक्ष अक्षय भोवते, तालुका कॉंग्रेस अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, उपाध्यक्ष नितीन राऊत, माजी जि.प.सदस्य जयमाला पेंदाम, माजी नगरसेवक गणेश फाफट, आरिफभाई खानानी, हरिश मोटवाणी आदींना दिले आहे.
     लवकरच युवक काँग्रेसमार्फत तालुक्यात जम्बो कार्यकर्ता जोडो अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पंकज चहांदे त्यांनी दिली.