दोन मुलांच्या आई असलेल्या विवाहितेचे त्या युवकाने न्यूड फोटो काढले अन्


नागपुर: पतीचे नात्यातील तरुणीशी प्रेमसंबंध असल्यामुळे दोन मुलांच्या आई असलेल्या विवाहितेनेसुद्धा इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या युवकाशी प्रेमप्रकरण सुरू केले. मात्र, त्या युवकाने विवाहितेचे न्यूड फोटो काढले. फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इंस्टाफ्रेंडच्या वारंवार लैंगिक शोषणाला कंटाळून महिलेने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. मोहम्मद इरशाद फारूक अंसारी (२३, रा. हिरवीनगर, नंदनवन, नागपूर) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २८ वर्षीय विवाहिता रिना (काल्पनिक नाव) हिला दोन मुले आहेत. तिच्या पतीचे नातेवाईक युवतीशी प्रेमसंबंध होते. त्याबाबत तिला माहिती मिळाली. त्यामुळे तिनेही कुण्यातरी युवकासोबत प्रेमसंबंध ठेवण्याचा निर्णय घेतला. तिची ओळख इंस्टाग्रामवरून आरोपी मो. इरशादशी झाली. तो कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून काम करतो. तर रिना ही एका ब्युटीपार्लरमध्ये काम करते. दोघांची ओळख वाढली. तो तिच्या घरी यायला लागला. दोघांत प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. रिना ही पतीचे घर सोडून माहेरी राहायला आली. आरोपी इरशाद हा अविवाहित असल्याने त्याने रिनाच्या दु:खात साथ देण्याचे आमिष दाखवले. त्याच्या आमिषाला महिला फसली. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ७ ऑगस्ट २०२१ ते ६ एप्रिल २०२३ पर्यंत आरोपीने पीडितेचे लैंगिक शोषण केले. यादरम्यान त्याने रिनाचे अनेक अश्लील छायाचित्र आणि चित्रफिती काढल्या.

शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचे छायाचित्र काढले. दरम्यान महिलेने आरोपीला लग्नाबाबत विचारले असता तो गोडीगुलाबीने बोलून वेळ मारून नेत होता. रिनाने जेव्हा लग्नाबाबत टोकाचे विचारले तेव्हा आरोपीने लग्नाला नकार दिला. पीडित महिलेने जेव्हा पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली, तेव्हा आरोपीने अश्लील मॅसेज, तिच्यासोबतचे फोटो इंस्टाग्रामवर टाकत बदनामी केली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली.