गडचिरोली _ आरमोरी येथील पुर्वाश्रमीचे लोजपाचे खंबिर , तडफदार नेतृत्व मुरलीधर भानारकर यांना पिरिपा पक्ष प्रवेशानंतर प्रेस क्लब गडचिरोली येथील पिरिपाच्या जिल्हा मेळाव्यात पिरिपाचे जिल्हाअध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांचा उपस्थितीत पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष , लॉग मार्च प्रणेते , माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी भानारकर यांचा सत्कार करून पिरिपाचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवड करून नियुक्तीपत्र बहाल केले.
मुरलीधर भानारकर हे गेल्या २५ वर्षापासुन लोजपाचे जिल्हा नेते म्हणुन सक्रिय होते. त्यांनी प्रा. जोंगेद्र कवाडे व प्रा. मुनिश्वर बोरकर यांचेवर विश्वास ठेवून पिरिपा मधे आपल्या शंभर कार्यकर्त्यांसहीत पक्षात प्रवेश केला. त्यांनी त्याच्या निवडीबद्दल माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे व प्रा. मुनिश्चर बोरकर यांचे आभार मानले. पक्ष प्रवेश करतेवेळी त्यांच्या सोबत राजेंद्र ठवरे , शामराव सहारे , प्रशांत मेश्राम, लोकमित्र रामटेके , लोकमित्र बारसागडे , सुभाष आंबेकर , अशोक बावणे ' पांडुरंग ढेभुर्णे , विलास भानारकर , देवेंद्र बोदेले , उमेश रामटेके , साचिन किरणापूरे , डाकराम ढेभुर्णे ' देवानंद गेडाम ' अमर बारसागडे आदि सहीत आरमोरी वडसा परिसरातील बहुसंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.