रांगी : धानोरा तालुक्यातील रांगी ते वानरचुवा मार्गावरील नर्सरीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली, यात तीन जण जखमी झाले. ही घटना २४ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता घडली.
प्रफुल्ल शेषराव गावळे (रा. गट्टेपायली), चरण नामदेव नैताम, अविनाश मोहन सिडाम (दोन्ही रा. कुरंडी माल ता. आरमोरी) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. प्रफुल्ल शेषराव गावळे हे रांगीहून दुचाकीवरून (एमएच ३४ एक्यू- १६२७) नरचुलीकडे जात होते, तर कुरंडी येथील चरण नैताम व अविनाश सिडाम हे दुचाकीवरून (एमएच 33 जे ९२६५)रांगीकडे जात होते. नाळेवाही नाल्यासमोर नर्सरीजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात तिघेही जखमी झाले. वाहनांचेही मोठे नुकसान झाने, कुरंडी येथील दोन्ही जखमींना रांगी प्राथमिक आरोग्य केंद्रात, तर प्रफुल्ल गावळे यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.