जो संविधानांचे काटेकोरपणे पालन करेल तो राज्य करेल- संतोषी ठाकुर ,औधी येथील डॉ. आंबेडकर जयंती


गडचिरोली _ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एवढया मेहनतीने भारताची राज्यघटना लिहली आणि म्हणाले की , राज्य कुणाचेही असेना परंतु संविधाना नुसार राज्य करणारी माणसे असतील तर जनतेचा विकास होईल. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन आदिवासी नेत्या डॉ. संतोषी ठाकुर छत्तीसगड यांनी औधी (मानपूर ) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रसंगी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १32 वी जयंती औधी ( छत्तीसगड ) येथे सामाजीक कार्यकर्ता अर्जुन सिह ठाकुर राजनांदगांव यांचे अध्यक्षते खाली तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संतोषी ठाकुर ' गोविंद शहा वाल्को , सुरज टेकाम , वेद कुवंर वाल्को , पत्रकार चौधरी , रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली चे अध्यक्ष प्रा. मुनिश्चर बोरकर , प्राचार्य एस . एल . बी. रामटेके अध्यक्ष क्षेत्रीय बौद्ध समाज औंधी , मारोती भैसारे , दिलीप गोवर्धन गडचिरोली आदी लाभले होते. याप्रंसगी गोविदशहा वाक्लो' सुरज टेकाम , वेदकुवंर वाल्को , पत्रकार चौधरी , दिलीप गोवर्धन आदीची समायोचित भाषणे झालीत . याप्रंसगी प्रा. मुनिश्चर बोरकर यांनी संविधानावार प्रकाश टाकून पूढे म्हणाले की , RPI चा एक आमदार किवा खासदार हा कांग्रेस किंवा भाजपाच्या शंभर आमदारा बरोबरीचा असतो म्हणूनच संविधानाला कुणी हात लावू शकणार नाही. तरीही संविधानाची एक लढाई पुन्हा लढावी लागणार आहे यासाठी सर्वाची एकजुट आवश्यक आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रामटेके संचालन ज्ञानेद्र रामटेके तर आभार बांबोळे यांनी मानले. कार्यक्रमास औधी परिसरातील जवळपास पाच हजार नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.