जावयाची खाटेवरच हातपाय बांधून गळा कापून हत्या


दिनेश बनकर कार्यकारी संपादक 

चंद्रपूर : बल्लारपूर येथे एकाची हातपाय बांधून गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.येथील न्यू कॉलनी रोड महाराणा प्रताप वॉर्ड दुर्गा माता मंदीरजवळ शामराव कोडूरवार यांच्या मृत्यूनंतर घराच्या प्रॉपर्टीकरिता नेहमी वाद होत असे. शामरावला मुलगा नसून तीन मुली आहेत. त्यात दुसऱ्या नंबरचा जावई विशाल दासरवार नेहमी सासू सोबत वाद घालायचा. अशातच शनिवारी 22 एप्रिल रोजी पहाटेला विशाल दासरवारची गळा कापून हत्या करण्यात आल्याची बाब उघडकीस आली.

घराचा प्रॉपर्टीकरिता विशाल नेहमी दारू पिऊन

सासूसोबत वाद घालत होता. विशालची पत्नीसुद्धा आपल्या पतीसोबत मिळून आईशी भांडण व मारहाण मारपीट करीत होते. पोलीस ठाण्यात दोन्हीकडून गुन्हे दाखल झाले आहे. अशातच विशालची खाटेवरच हातपाय बांधून गळा कापून हत्या करण्यात आली. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.