छत्तीसगडचे दोन तरुण दुचाकी अपघातात जागीच ठार





घोट : भरधाव दुचाकी एका वळणावर रस्त्याखाली जाऊन येणाच्या झाडावर धडकली. यात गंभीर जखमी होऊन छत्तीसगडचे दोन तरुण जागीच ठार झाले. ही घटना १२ एप्रिलला दुपारी ३ वाजता रेगडी- कोठमी मार्गावर घडली.

रुपेश नैताम (वय २५, सूर्यडोंगरी, ता. सुरिया, जि. राजनांदगाव) व लोकेश शाहू (वय २५, रा. भोलापूर, ता. सुरिया, जि. राजनांदगाव) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. ते )रा.छत्तीसगडचे आहेत. दुचाकीवरून (सीजी ०४ केपी १७२८) ते रेगडी-कोठमी मार्गावरून जात होते..



रेगडीपासून पाच ५ किलोमीटर अंतरावरील वळणावर त्यांची दुचाकी घसरली. ते रस्त्यालगत कोसळले. दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रेगडी मदत केंद्राचे उपनिरीक्षक यशवंत वलधरे तपास करत आहेत.