ओबीसी समाजाला वैरी आणि कैवारी कोण ओळखता येत नाही?.




     ८५ टक्के समाजाला बहुजन समाज म्हटल्या जाते.त्यात ओबीसी समाजाची संख्या ५२ टक्के आहे.या एकूणच बहुजन समाजात वेग वेगळ्या प्रकारचे चमचे आहेत.स्टीलचे,लोखंडाचे,अल्युनियमचे,लाकडाचे यांचा वापर मोठ्या कामासाठी होतो पण सध्या प्लास्टिकच्या चमच्याचा वापर मोठ्या प्रमाणत होत असतो.वापरा आणि फेकून द्या.बहुजन समाजातील चमचे अशा शीर्षकांचा विचार माझ्या मनात सतत येत राहतो. बहुजनातील काही जातीचे लोक हे स्वतःला बहुजनचं समजत नाही.त्याची कारणे खूप आहेत, परंतु ते स्वतःला बदलायलाही तयार नाहीत. त्यांना वाटते 'परिवर्तन संसार का नियम है' पण या बह्याडाला माहिती नाही कि नियम निसर्गाचा असतो.तो तो सतत बदलत असतो त्यानुसार आपण बदलले पाहिजे.संसार का नियम म्हटले की रामायण महाभारत आठवावा लागेल.त्यातही जात,वर्ण पाहून नियम बदलतात हे बह्याड ओबीसी ना समजतच नाही.आणि म्हणतात 'परिवर्तन संसार का नियम है' या म्हणी प्रमाणे माणूस बदलणे आवश्यक आहे. 
     उच्च वर्णीयांच्या घरात जन्मा पासूनच पात्रता असते.आपल्या ओबीसी बहुजनामध्ये वयानुसार तरी वैचारिक पात्रता येणे ही आवश्यक आहे कि नाही. पण तो धर्माचे नियम,रीतीरिवाज परंपरा या नियामचे पालन करतो.आजच्या काळात वेग वेगळ्या विषयांचे आपलं वाचन वाढवणे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे.परंतु बहुजन ओबीसी समाजाच्या लोकांच्या हातामध्ये योग्य पुस्तक पडले नाही पाहिजे यांचीच काळजी घेतली जाते. किंवा पडू दिले तर वाचून जास्त शाहणा बनू नये यांची सक्त ताकीद दिली जाते.म्हणूनच बहुजन ओबीसी समाजातील उच्च शिक्षित डॉक्टर,प्राध्यापक,वकील, इंजिनियर,बी ए बी एड शिक्षक,आर्ट,सायन्स कॉमर्स मधील कोणताही पदवीधर जाती व्यवस्थेत समाज व्यवस्थेत मेंदू न वापरता आचरण करतो.म्हणूनच लोक चमचा म्हणतात.कारण चमचा स्वत: काहीच करू शकत नाही.कोणी तरी त्याला हातात घेऊन वापरते त्या प्रमाणे तो काम करतो. त्यामुळेच बहुजन ओबीसी समाजाच्या लोकांचे खूप मोठे नुकसान होत आहे आणि झालेले आहे.जोपर्यंत बहुजनातील लोकांना आपण कोण,आपले हितचिंतक कोण,आपले कैवारी, उद्धार करते कोण,आपलं कोणत्या लोकांनी, कोणत्या समाज सुधारकांनी,कोणत्या प्रबोधनकारांनी,कोणत्या साधू,संतांनी आणि कोणत्या आजकालच्या नेत्यांनी हिताचे,सर्वांगीण विकासाचे मुद्दे घेऊन विचार केला.लोकांमध्ये जनजागृती केली त्या लोकांना साथ देणे त्या लोकांच्या विचारांचा प्रचार,प्रसार करणे हे बहुजन ओबीसी समाजाच्या लोकांचे कर्तव्य आहे.उलट आपलेच हितचिंतक,समाज कैवारी ओळखल्या जात नाही.उलट त्याच लोकांना त्रास दिल्या जातो त्याच लोकांची जाणीवपूर्वक बदनामी आपल्याच लोकांकडून केल्या जाते. 
         इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज, महात्मा फुले,राजर्षी शाहूजी महाराज,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जात पाहू नका वैचारिक परिवर्तन घडविणारे काम पहा त्यांनी ओबीसी समाजाला वैरी आणि कैवारी कोण हे सह्प्रमान दाखवून दिला आहे.म्हणूनच तो इतिहास वाचा आणि विचार करा,न वाचाल्यामुळेचं ओबीसी समाजाला वैरी आणि कैवारी कोण ओळखता येत नाही?.आता नवीन मध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे,डॉ.नरेंद्र दाभोळकर कुलबर्गी,वगैरे त्यांची बदनामी तर सोडाच यांना मारण्यापर्यंत तयारी करण्यात आली हा इतिहास लोक वाचत नाही. समजून घेत नाही. समजून दिल्या जात नाही समजून दिल्या जात असेल तर समोरची व्यक्ती आपलीच असून विरोध करते याला कारण मनुवादी विचारसरणीचा पगडा,वामन वृत्ती रक्ता रक्तात भिनलेली असल्यामुळे आपलेच लोक आपले वैरी होतात आणि झालेले आहेत.म्हणूनच मी लिहतो ओबीसी समाजाला वैरी आणि कैवारी कोण ओळखता येत नाही?.
      भारतीय समाजामध्ये जाती व्यवस्था आहे. शूद्र म्हणून असलेल्या जाती आणि त्यांची कॅटेगिरी वेगवेगळी जरी असली तरी ओबीसी,एससी,एंनटी ह्या तीनही कॅटेगरीमध्ये हजारो जाती आहेत आणि सगळ्याच्या सगळ्या शूद्र अति शूद्र आहेत परंतु ह्या सगळ्या जातीतील लोक आपण शूद्र अति शूद्र आहेत हेच म्हाणायला तयार नाही. आज आपल्याला, जनतेला चौथा वर्ग पास झालेले नेते, असे लोक मी म्हणणार नाही, परंतु बहुतेक कमी शिकलेले राजकारणी,स्वयंघोषित धर्मपंडित,ढोंगी साधू,संत,कीर्तनकार,कथा वाचक,बाबा,बुवा हे सर्व लोक बहुतेक लोक समाजातील सर्व घटकातील लोकांना आपसात भांडण लावून गुंतवून ठेवण्यात यशस्वी झालेत आणि होत आहेत.(परंतु समाजाच्या हिताचे काही लोक यातील खूप चांगले काम करत आहेत अपवादात्मक सोडले तर,) तर समाजाने आपले हितचिंतक ओळखून आपल्या विकासाचा अजेंडा जे लोक वापरतात, सांगतात किंवा बोलतात आणि तसेच करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना साथ देणे त्यांचा प्रचार प्रसार करणे त्यांच्या कार्याची चिकित्सा करून आत्मसात करणे हे समाजातील सुज्ञ व्यक्तीचे,लोकांचे काम आहे. ते रोखठोकपणे होत नसल्यामुळेच बहुजन ओबीसी समाजाला वैरी आणि कैवारी कोण ओळखता येत नाही?.
 प्रभाकर खानझोडे ९४२०६२४२४३,पुसद,जिल्हा यवतमाळ.