केंद्रप्रमुखांच्या हस्ते पेंढरी केंद्रातील विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप

 
 धानोरा तालुक्यातील पेंढरी केंद्रामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे किट दिनांक 13 एप्रिल रोजी केंद्रप्रमुख मन्साराम मेश्राम सर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. 
     मागील दोन वर्षांपासून धानोरा तालुक्यामध्ये TIP हा कार्यक्रम सिखे संस्था मुंबई, शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांच्या संयुक्त माध्यमातून राबवण्यात येत आहे. 
     सिखे संस्थेमार्फत यावर्षी पेंढरी, दुर्गापूर आणि धानोरा केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असलेले किट भेट म्हणून देण्यात येत आहे. पेंढरी केंद्रामध्ये केंद्राचे केंद्रप्रमुख मन्साराम मेश्राम सर यांच्या स्व-हस्ते विद्यार्थ्यांना सदर किटचे वाटप करण्यात आले. मिळालेले किट मधील साहित्य पाहून विद्यार्थ्यांना खूपच आनंद झाला. धानोरा तालुक्यातील पालक वर्गाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मुलांना शालेय साहित्य वेळेवर मिळत नाही. असेल त्या साहित्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्य चालू असते. त्यामुळे सिखे संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीमध्ये घरी राहून आपले शालेय कार्य करता यावे यासाठी साहित्य देण्याचे ठरविले आणि त्यानुसार तिन्ही केंद्रातील विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन्सिल, पेन, खोडरबर, शॉपनर, चित्रकला वही, स्केचपेन, रंगीला बॉक्स असे विविध साहित्य असलेले किट देण्यात येत आहे. मिळालेले साहित्य किट पाहून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. याची सुरुवात पेंढरी केंद्र, दुर्गापूर केंद्र आणि धानोरा केंद्रामधील एकूण 48 शाळेतील 570 विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. 
       या सर्व साहित्याचे वाटप मा. हर्षवर्धन डांगे सर जिल्हा समन्वयक चंद्रपूर - गडचिरोली तसेच मा. संदीप पाटील सर स.जि. समन्वयक गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली सिखेच्या वतीने मार्गदर्शक म्हणून धनराज कोहळे आणि गजानन मारगाये यांनी वाटप करण्याचे काम केंद्रप्रमुख सरांच्या माध्यमातून करत आहेत. मिळालेले साहित्य पाहून पालक सुध्या आनंदित दिसून येत आहेत. देण्यात आलेले साहित्य हे खरोखरच मुलांना सुट्टीमध्ये लाभदायक ठरतील तसेच मुलांना उन्हाळी सुट्टीमध्ये घरी राहून लेखन कार्य, चित्र काढून रंगविणे यासाठी फायदेशीर ठरणारे आहे असे मत केंद्रप्रमुख मन्साराम मेश्राम यांनी व्यक्त केले. तसेच सिखेच्या या कार्याचे त्यांनी कौतुक करून पुढील वर्षी सुध्या याचप्रमाणे कार्य करावे यासाठी शुभेच्छा दिल्या.