महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातील डोंगरदरीत वसलेले फुलझरी हे आदिवासी बहुल वस्तीत वसलेले ग्रामीण भागातील गाव आहे. विशेष सांगायचे म्हणजे फुलझरी गावात बौद्ध समाजाचे (अनुसूचित जातीचे ) एकही घर नाही. गावातील युवा मंडळींनी या वर्षीपासूनच डॉ. भीमराव आंबेडकर यांचे जन्मदिना पासूनच जयंती साजरी करायची ठरवले आहे.
आज या गावातील प्रत्येक शेतमजूर, कष्टकरी, आदिवासी माणूस बाया ह्या आजच्या दिवशी कामावर न जाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने घरीच राहिले. आणी गावातील चौका चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाचे फलक लावलेत. सदर गाव हर्ष उल्हासाने न्हाहुन निघाले होते आणि सकाळी सर्वजण आदिवासी बांधव हे पंचशील झेंड्याजवळ हजर होऊन गावातील सामाजिक कार्यकर्ता ह्यांचे मार्फत ध्वजारोहण करून सामूहिक वंदना घेण्यात आली. गावात सामूहिक भोजनाचा त्यांनी कार्यक्रम ठेवला आहे.
गाव फुलझरी येथील स्थानिक आदिवासी बांधव यांना विचारणा केली असता त्यांनी एकच उत्तर दिले - " "आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत हे कळू दिले नाही. मात्र समोर येणाऱ्या आमच्या पिढीला आमचा खरा बाप कोण आहे हे माहित व्हावे या हेतूने आजच्या दिनापासून येणाऱ्या दरवर्षीला भीम जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे*". हे एक विचाराचे परिवर्तन समजावे.