अन् पोलीसांनी घेतले आंटीला ताब्यात


महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लॉजवर चोरून लपून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची प्रकरणे समोर येत आहेत मात्र आता चक्क पत्र्याच्या शेडमध्ये देखील असे प्रकार सुरू झालेले आहेत. बीड जिल्ह्यात एक अशीच घटना समोर आलेली असून याप्रकरणी एका आंटीला ताब्यात घेण्यात आलेले आहे.

बीड सोलापूर हायवेवरील मांजरसुंबा येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्याप्रमाणे सापळा रचून पोलिसांनी एका नकली ग्राहकाला तिथे पाठवले होते. ग्राहक तिथे पोहोचला आणि त्यानंतर त्याने आंटीकडे तरुणीसोबत विचारणा केली त्यावेळी आंटी हिने पैसे स्वीकारत असतानाच पोलिसांनी तिला ताब्यात घेतलेले आहे.

जयाबाई व्यंकट लांडगे ( वय 58 वर्ष राहणार मांजरसुंबा तालुका बीड ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आंटीचे नावातून तिच्या विरोधात नेकनुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर आरोपींच्या ताब्यातून मांजरसुंबा येथील एक महिला आणि नगर जिल्ह्यातील एका पीडित महिलेची सुटका करण्यात आलेली आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली असून अशाच पद्धतीने जिल्ह्यातील इतरही ठिकाणी देखील पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केलेली आहे.