सत्यमेव सार्वजनिक वाचनालय वैरागड येथे जागतिक पुस्तक दीन उत्साहात साजरा..


दि.२३/०४ /२०२३ ला जागतिक ग्रंथ दिवसाच्या निमित्ताने सत्यमेव सार्वजनिक वाचनालय वैरागड त. आर मोरी जिल्हा.गडचिरोली येथे सकाळी:-११:०० वाजता प्रा.कुंभरे सर यांच्या हस्ते , डॉ .एस.आर रंगनाथन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून एक दिवशीय पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

   या प्रसंगी कुंभरे सर यांनी उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाचे व वाचनाचे महत्व, महापुरुषांनी सांगितलेल्या विचारांचा दैनंदिन जीवनात उपयोग करणे व त्यानुसार आचरण करणे असे मोलाचे मार्गदर्शन केले.


     यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री.शिवशंकर पाटील सर यांनी वाचनालयाचे महत्व व या वाचनालयाचा मानवाचे सर्वांगीण विकासासाठी कसे उपयोगाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले.. कार्यक्रम घेण्याचे उद्देश वाचन संस्कृती वाढविणे व लहान मुलांना वाचनाची सवय लावणे आहे असे संस्थेचे सचिव पंकज देशपांडे यांनी सांगितले.

    याप्रसंगी वसाहतितील व बाहेरील विद्यार्थी व पालक,त्याचबरोबर वाचनालयाचे पदाधिकारी , संचालक मंडळ व सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रतीक लाऊतकर यांनी केले तर 

   आभार संस्थेचे ग्रंथपाल नरेश राऊत यांनी मानले.