गुलाम बनविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.





      केंद्र व राज्य सरकारने जाहीरपणे सर्व सरकारी नोकऱ्या ठेकेदाराला देऊन कंत्राटी कामगार भरती सुरु केली.त्याला त्याला मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी त्यांच्या राष्ट्रीय महासंघांनी पोटतिडकीने विरोध केल्याचे दिसत नाही.केंद्र सरकारने सार्वजनिक उधोग धंद्याचे खासगीकरण सुरु केले.भारतातील सर्वात मोठी सेवा देणारा उधोग धंदा म्हणजे भारतीय रेल्वे.प्रत्येक देशाची सर्वात महत्वाची सेवा देणारी यंत्रणा ही रेल्वे असते.बाराही महिने चोवीसतास नागरिकांना सेवा देणारी ही यंत्रणा जेव्हा खाजगी मालकाच्या हातात जाते.तेव्हा नागरिकांचे आर्थिक शोषण करण्याचा तो मुक्त परवाना असतो.एक काल असा होता की प्रत्येक रेल्वे स्टेशनवर पिण्याचे पाणी मोफत उपलब्द करून देणे ही भारतीय रेल्वे प्रशासनाची नैतिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी होती.तीच प्रथम संपविण्यात आली.त्यावेळी कामगार,कर्मचारी अधिकारी काहीच बोलले नाही.नागरिकांनी खंत व्यक्त केली यापलीकडे त्यांनी काहीच केले नाही.कामगार संघटीत होते.नागरिक संघटीत नव्हते. कामगार,कर्मचारी अधिकारी हे कामाच्या जागेवरून बाहेर पडले की तेही नागरिक असतात. त्यांचे कुटुंबातील नात्यातील लोक ही नागरिक असतात.हेच ते विसरले.त्यामुळेच मोफत मिळणारे पिण्याचे पाणी आज सर्वजन वीस रुपये लिटरने विकत घेऊन पितात.स्टेशनवरील स्टोल वर मुबलक प्रमाणत पाण्याच्या बाटल्या उपलब्द असतात.मेल एक्ष्प्रेस्स गाड्यात फेरीवाले १५ पाणी बाटल २० रुपयाला विकतात.एम आर पी १५ असतांना २० रुपये का?.ठीक आहे साब स्टेशनवर घ्या सांगतो.५ रुपया साठी वाद घालत बसले तर इतर प्रवाशी बोलणाऱ्याला येड्यात काढतात. काही फेरीवाले सांगतात साहेब आम्हाला पगार नसतो. आम्ही जेवढी विक्री केली तेवढे वरचे पैसे हाच पगार असतो.प्रत्येक पॉकेट विक्रीवर पाच रुपये जास्त घेतली जातात. ठेकेदाराची कंत्राटी कामगार कुठे तक्रार करणासाठी कोणाला वेळ आहे.रेल्वे पोलीस,आर पी एफ,ठेकेदार, दिवटीवर असलेला टी सी सर्वच एका माळेचे मनी असतात.अशी ही गुलाम बनविण्याची प्रक्रिया देशात सुरु झाली.
      सरकारी नोकरी करणाऱ्या कामगार,कर्मचारी अधिकारी यांना वाटते आपणास पांच आकडी पगार घेत असल्यामुळे आपल्याला त्याची झळ पोचणार नाही. पण आपले कुटुंब आपले नातलग हे प्रवाशी म्हणून किंवा देशाचे नागरिक म्हणून या एकूण प्रक्रीये पासून सुरक्षित असतील असे त्यांना वाटते. पण तसे होईल काय?.आज काही असंघटीत कामगार तरुण सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनापेक्षा निम्म्या वेतनात काम करायला तयार आहे. हे काम करणारी बिहार झारखंड उतराखंडची तरुण पोरे आज काम करतात. उद्या त्या तरूणांना मिळणाऱ्या वेतनाच्या निम्म्या वेतनात काम करणारी पिढी ही उदयास येऊ शकते यांचंही भान ठेवणं गरजेचं आहे. खरंतर त्यांच्यापेक्षा मला कमी वेतन द्या, ही भुमिका जितकी लाचारीची आहे तितकीच ती भविष्यात राज्यकर्त्यांना मनमानी करण्याची संधी देणारी आणि समाजातला सुसंवाद संपविणारी आहे यांचंही भान राखायला हवं.उत्तर प्रदेश, बिहार मधील लोक कुठे ही जाऊन कोणतेही काम कमी मजुरीत करण्यासाठी तयार आहेत.कारण त्यांना गावात दोन वेळचे पोटभर जेवण मिळत नाही म्हणून ते कुठे ही मिळेल ते काम करण्यासाठी तयार आहेत.ही गुलाम बनविण्याची प्रक्रिया देशात सुरु झाली आहे.
      खालील कथेतून ही मानसिकता स्पष्ट व्हायला मदत व्हावी.खूूप वर्षापूर्वीची एक कथा.रोमन रिपब्लिकमध्ये गुलामीची पध्दत होती.गुुलामांना राबवून घेत मग साखळदंडांनी बांधून कोठडीत कैद करून ठेवीत असत.रोमचा उच्चभ्रू वर्ग गुलामांप्रती इतका क्रूर,संवेदनहीन झालेला की,मनोरंजनासाठी पूर्वी प्राण्यां-प्राण्यांच्या, माणसां-माणसांच्या झुंजी लावून त्यांना मज्जा येईनाशी झालेलेली.मग एकदा टूम काढली.आता गुलामांचीच मरणांतिक झुंज होणार. झुंजीत दोनपैकी एक जगेल त्याला गुलामीतून मुक्ती मिळणार! मुक्ती कुणाला नको असते?. झालं. गुलाम लढायला एकमेकांना मारायला तयार झाले. 
        एक जोडी अशीच गुलामीतून मुक्तीसाठी जिवाच्या आकांताने एकमेकांच्या जीवावर उठलेली.दोस्तच होते ते.एकाच कोठडीतले.गुलामीच्या समग्र मुक्तीचं स्वप्न त्यांना कुणी सांगितलं नव्हतंच.आणि त्यांनाही सुचलं नव्हतं.तर हे ताकदवान गडी एकमेकांशी टकरत, बोचकारत,लचके तोडत लढत होते.नाईलाज होत त्यांचा. आणि दोस्त असले तरी मुक्तीसाठी मरणांतिक झुंज हाच एकमेव मार्ग त्यांना सत्ताधाऱ्या कडून खुला झालेला.
तर जाम लढले दोघं. त्यातला एकजण जरा युवक/तरूण इतका मुक्तीसाठी आसुसलेला, तहानलेला की बस्स! त्याने वेगाने जरा जेष्ठ गुलाम प्रतिस्पर्ध्याला लोळवलं. तो पण दमला तरी शेवटपर्यंत धडपडत होतातच. मरतच नव्हता.मग हा पठ्ठा त्याच्या छातीवर बसला अन् नरडीचं रक्त पिऊ लागला. हे बघून प्रेक्षक गॅलरीतून फ्लाईग कीस आले,अनेकजण 'अमेझिंग,अनबिलीव्हेबल,वाॅऊ...' म्हणून चित्कारले.ही चित्तथरारक झुंज बघून रोमचे उच्चभ्रू रिपब्लिकन नागरिक आनंदाच्या परमोच्च शिखरावर पोहचलेले.आणि सगळ्यांना वाटलं तसंच जिंकलेल्या युवा/तरूण गुलामाला पण वाटलं की आता त्याच्या गळ्यात मुक्तीची माळ पडणार. तो रोमचा मुक्त नागरीक बनणार. घरगृहस्थी बसवून सुखात जगणार.
     पण रोमचे उच्चभ्रू नागरीक एवढे उदार-सरळ नव्हते ना! भलतेच क्रूर ते! राजाला कोणीतरी अजून मनोरंजन आयडीया सूचवली. म्हणालं की, 'बघा विचार करा. एवढ्यात काय म्हणून याला मुक्ती देता?.जर हा माणसासोबत एवढा मनोरंजक लढला तर वाघासोबत कित्ती भारी लढेल? याची झुंज उपाशी वाघासोबत लावा' राजाने रोम रिपब्लिकन प्रेक्षकांसमोर प्रस्ताव ठेवला. सगळे ओरडले 'ग्रेट! हे असंच व्हायला हवं!!'.....
आता पुढं काय घडलं? ते सांगायची गरज आहे का?.तर अर्ध्या पगारात काम करायला निघालेल्या सुशिक्षित बेरोजगारांची कमी पगाराची का होईना नोकरी करण्याची आणि पेन्शनमागत्या आंदोलकांना पराभूत करण्याची ओढ काय अगदीच चूक म्हणता येणार नाही.पण तुमचा शेवट कसा होणार? मनुस्मृती नुसार देशात सर्व वर्ण व्यवस्थेची स्थापना म्हणजेच गुलाम बनविण्याची नव्याने प्रक्रिया सुरु होणार.
     भारत लवकरच हिंदू राष्ट्र बनणार.म्हणजे आज देशात हिंदूचे प्रमाण कमी आहे काय?. शेतकरी,शेत मजूर,कामगार,कर्मचारी अधिकारी बहुसंख्य हिंदूच आहेत.पण प्रत्येक वर्गाच्या श्रमिकांची जात वेगवेगळी आहे.बघा सर्व क्षेत्रातील श्रमिकांनो एकमेकांत लढण्यापेक्षा शत्रूला ओळखा.आपण खूप ताकदवान माणसं आहोत.पण आपल्याला कुणाशी लढायचं? ते नेमकं कळत नाही. तिकडे खाजकी कंपन्यांचे मालक लूटून घबाड घेऊन चालले.पण आपण ढिम्म. आणि सरकारी नोकर पेन्शन मागतात म्हणून लगेत सरकारी तिजोरीची राखणदारी करायची जबाबदारी त्यांनी स्वतःच ओढून घेतलीय म्हणजे!.आपण भारतीय नागरिक मतदार म्हणून ती सहज दिली आता परिणाम भोगण्याची तयारी ठेवा म्हणजेच गुलम बनण्याची तयारी ठेवा.कारण गुलाम बनविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.