तिरोडा : अज्ञात वाहनाने ऑल्टो कारला दिलेल्या धडकेत कारमधील एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना तिरोडा तालुक्यातील पांजरा गावाजवळ मंगळवारी रात्री ११:३० ते १२ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील वडेगाव येथील दोमाजी ठाकरे हे आपल्या ऑल्टो कार क्रमांक एमएच आले. ३०. पी १३६२ ने वडेगाव येथून मेहगाव (तुमसर येथे लग्न व रिसेप्शनकरिता सून मंगला ठाकरे, सून नंदना ठाकरे व नातू सूर्यकांत आदी कुटुंबातील तीन सदस्यांसह गेले होते. दरम्यान स्वागत समारोह आटोपून गावाकडे येत असताना पांजरा गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक दिल्याने डोमाजी ठाकरे (८५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर नातू इंदल ठाकरे याचा उजवा पाय तुटला तसेच दोन्ही सुनांना किरकोळ मार असून, त्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची नोंद तिरोडा पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास सहायक फौजदार शिवलाल धावडे व महेंद्र अंबादे करीत आहेत.