सुरजागड इलाकाच्या दुर्गम तोडगट्टा गावात डॉ आंबेडकर जयंती ‘अशी’ झाली साजरी

 


एटापल्ली : 
तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी बहुल व नक्षल प्रभावी सुरजागड इलाका पट्टीतील छत्तीसगड राज्य सीमेवरील तोडगट्टा गावात पहिल्यांदाच लोकशाहीचे जनक भारतीय संविधान निर्माते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी जगातील अतिमागास समाजाच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या माडिया जमती समाजाकडून जयभीमचा गजर करून लोकशाहीचा जागर करण्यात आला.


सुरजागड इलाका पारंपरिक गोटूल समिती व दमकोंडावाही बचाव संघर्ष समितीच्या वतीने 11 मार्च पासून सुरजगडसह विविध पहाडांवरील लोहखनिज उत्खनन बंद करणे, गट्टा ते तोडगट्टा आंतरराज्य मार्गाचा रस्ता निर्माण करण्यात येऊ नये, आदिवासी पेसा अनुसूचित क्षेत्रात पोलीस मदत केंद्रे उभारण्यात येऊ नये, वैद्यकीय रुग्णालय, शाळा, महाविद्यालयांची निर्मिती करणे, दुर्गम भागातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावे, मागास भागात भौतिक व मूलभूत सोयीसुविधा निर्माण करण्यात यावे, अशा मागण्या घेऊन गेली एक पाहिन्यांपासून तोडगट्टा गाव जंगल परिसरात शेकडो आदिवासी नागरिकांकडून ठिय्या आंदोलन केले जात आहे, नागरिकांच्या आंदोलनाला कोणत्याही स्थानिक राजकीय पक्ष, संघटना व पुढाऱ्यांनी समर्थन दिले नसून शासन प्रशासनाकडूनही आंदोलनाची दखल घेतली गेली नाही हे विशेष!


सदर आंदोलन स्थळ परिसरात आयोजित विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रमाचे उदघाटक माजी जिल्हा परिषद सदस्य सैनु गोटा यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, जयंती उत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आंदोलनाचे अध्यक्ष रमेश कवडो हे होते, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना गट्टा ग्रामपंचायतच्या सरपंच पूनम लेकामी यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अगाध तत्वज्ञान, विचारधारा व संविधानाच्या तत्वावर विश्वातील मूलनिवासी नागरिकांनी एकत्र येऊन अदिवासींचे ब्रीद मावा नाटे, माटे सरकार, जल, जंगल, जमिनीवरील मालकी हक्क मिळविण्यासाठी शूरवीर शहीद सिद्ध कान्हो, राणी दुर्गावती, तंट्या भिल्ल, बिरसा मुंडा, शहीद वीर बाबूराव शेडमके, भूमकाल आंदोलनाचे प्रणेते शहीद गुण्डाधुर माड़िया व मांजी देब्रधर यांचा संघर्षशील वारसा मजबूत करण्यासाठी लोकशाही व अहिंसा मार्गाने न्याय्य हक्काचा लढा लढण्याची आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.


माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड लालासु नगोटी यांनी बोलतांना डॉ बाबासाहेबांचा जन्म देशात सामाजिक विषमता असतांना झाला होता, त्यामुळे त्यांना संपूर्ण जीवनभर सामाजिक विषमतावादा विरूद्ध लढ़ा देऊन सामाजिक एकता व समानता निर्माण करण्याचा संघर्षातुन करावा लागला असल्याचे सांगितले, माजी जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा, यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व समाज घटक, स्त्री, पुरुष, नागरिकांना समान अधिकार बहाल करून दिले आहेत. डॉ बाबासाहेबांनी बहाल करून दिलेल्या मौलिक संवैधानिक अधिकारामुळे देशातील मूलनिवासी समाज घटक आज आपला हक्क व अधिकाराची लढाई लढतांना दिसून येत असल्याचे मार्गदर्शनातून सांगितले, माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी, आशीष पुंगाटी, दलसू दुर्वा, पांडू मट्टामी, मुंसी दुर्वा, सुधाकर गोटा, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, अनिल नरोटे, गजानन पदा, सतीश हिचामी व मैनी कचलामी, यांनी समयोचित मार्गादेशन केले.


कार्यक्रमाचे प्रस्ताविक मंगेश नरोटी, संचालन साई कवडो, आभार राकेश आलाम यांनी व्यक्त केले यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शिला गोटा, नगरसेवक मनोहर बोरकर, सूरज भांडेकर,लक्ष्मण नवडी, मंगेश नरोटे, श्रावण चांदेकर, प्रेमदास चांदेकर, दोहे हेडो, सैनू हिचामी, मंगेश हेडो, सुशीला नरोटे, सविता कौशी, सुशीला तिग्गा, सुनीता कवडो, कन्ना गोटा, शंकर आत्राम, प्रदीप हेडो, रमेश महा, सत्तु हेडो, पांडू कौशी, दुलसा कौशी व सुरजागड इलाका पट्टीच्या अतिदुर्गम, आदिवासी बहुल व नक्षल प्रभावी सत्तर गावातील ग्रामसभा प्रतिनिधीसह पाच हजारांहून अधिक संख्येने आंदोलक नागरिक उपस्थित होते.