फक्त पैशासाठी विकल्या जाणाऱ्या भाड्याच्या बैलांनी आमच्या लेकरांना काय शिकवतात!......
-----------------^--------------
देशात सध्या क्रिकेटच ज्वर आलं आहे . ज्या क्रिकेटला बघण्यासाठी करोडो विद्यार्थी आपले करियर पणाला लावले आहे . स्वतःचा अभ्यास परीक्षा याची तमा न बाळगता आपल्या आयकॉन चा पाठलाग करतात . पालकांनी पण तशी मूकसंमती दिलेली आहे कारण उशिरा रात्रीपर्यंत प्रत्येक घरी टि व्ही चालूच असते .
*सरकारचे डोके पण ठिकाणावर नाही.भारतामध्ये ऐन परीक्षेच्या वेळीच असे IPL कसे येतात.आयुष्याचा टर्निंग पॉईन्ट असलेले १० वा १२ वा वर्ग तसेच सर्व विद्यापीठीय परीक्षा मार्च एप्रील महिन्यात असतात तेव्हाच हे कसं काय येतं असा विचार कोण्याही सुज्ञाला येऊ नये .
*बरं यात काय तर कोणी पैसे वाल्यांनी भाड्याचे विकत घ्याव अन् इतरांनी ते पाहावं . हजारो विद्यार्थी नव्हे करोडो विद्यार्थी या खेळामुळे बरबाद होत आहेत याच सरकारला गांभीर्य नाही . कधि अभ्यासासाठी ११ वाजे पर्यंत जागणार नाही परंतू प्रत्येक मॅच जागून पाहणारच .*
*केवळ पैशासाठी विकल्या जाणाऱ्या भाड्याच्या बैलांनी आमच्या लेकरांना काय शिकवतात तर कोल्डींक प्यावे दारू प्यावे ऑनलाईन रम्मी खेळावी . Dream 11 सारखे अनेक जुगार खेळत बसा . सध्याचे सिनेस्टार सुद्धा दारू जुगार गुटखा अशा कितीतरी अनावश्यक व समाज विघातक गोष्टींचे जाहीरात करतात . आम्ही अशांना आदर्श मानायचे काय ?*
*मुलांनो वेळीच सावरा अन्यथा पुढे आपलं आयुष्य अंध:कारमय आहे . त्यांना प्रत्येक गोष्टीला पैसे मिळतात आणि आपणास प्रत्येक गोष्टी साठी आई-बाबांच्या मेहनतीचे पैसे गमवावे लागतील .
*खेळातून खेळ भावनेचा विकास झाला पाहीजे परंतू जीवनाचा खेळ व्हायला नको . तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो . खेळाकडे एक उत्तम व्यायाम म्हणून बघा बाकी काही नाही .*
*सध्याचे क्रिकेट म्हणजे तीन लाकडे अन् अकरा माकडे सारे घालती धनदांडग्याना साकडे अशीच अवस्था आहे .*
*देशासाठी खेळताना कारणे सांगतील पण पैशासाठी जीवाचे रान करतील . असो त्यांचे त्यांचा मागे परंतू आपण शिक्षणातून आपले आयुष्य घडवताना नको त्या गोष्टीकडे लक्ष वेधून आपले आयुष्य उध्वस्त न करता तेवढाच वेळ पुस्तकात आणि अभ्यासात घालवून आई बाबा सोबतच आपल्या स्वप्नांना आकार देवू या .*
*चला आज निश्चय करू या,पुस्तक संस्कृती वाढवू या!*👍
आपलाच
शंकर रामलूजी केमेकार
मुख्याध्यापक
जि प उ प्राथ शाळा अहेरअल्ली पं स झरी जि यवतमाळ🌹