अन् सासरा शारीरिक सुखासाठी सूनेकडे करत होता मागणी


नगर जिल्ह्यात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून सहा महिन्यापासून सुनेकडे शारीरिक संबंधासाठी मागणी करणाऱ्या सासऱ्याने अखेर गरोदर असलेल्या सुनेचा गळा आवळून खून केलेला आहे तर तिच्या दोन वर्षाच्या नातीला देखील पाण्यात बुडवून तिचा देखील या नराधमाने जीव घेतलेला आहे. शेवगाव तालुक्यातील मजले शहर येथील ही घटना असून घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, ऋतुजा संतोष लोढे ( वय 22 वर्ष ) असे मयत सुनेचे नाव असून कारभारी ज्ञानदेव लोंढे असे या नराधम सासऱ्याचे नाव आहे. त्याचे वय 62 वर्ष असून गेल्या सहा महिन्यांपासून तो शारीरिक सुखासाठी सुनेकडे मागणी करत होता. ऋतुजा ही पाच महिन्यांची गरोदर असल्याचे देखील समोर आलेले असून तिच्या चुलत्यांनी आरोपीच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे..

ऋतुजा हीचे लग्न झाल्यापासून तिचा सासरा तिच्यावर वाईट नजर ठेवून होता. तिच्या चारित्र्यावर देखील तो अनेकदा संशय घेत असायचा आणि गेल्या काही महिन्यांपासून तर त्याने त्याच्याही पुढे कळस करत तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी सुरू केली. ऋतुजा ही सातत्याने त्याला नकार देत होती मात्र तरी देखील हा नराधम तिचा पिच्छा सोडत नव्हता.

गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास त्याने तिचा गळा आवळला त्यात तिचा मृत्यू झाला त्यानंतर त्याने स्वतःची नात समृद्धी हिला देखील पाण्याच्या टपात बुडवत ठार मारले. ऋतुजा हिचा भाऊ तिला भावी निमगाव येथे यात्रेसाठी घेऊन आलेला घेऊन जाण्यासाठी घरी पोहोचला त्यावेळी ती ओट्यावर पडलेली होती तर सासरा कारभारी याने समृद्धी हिला देखील पाण्यात बुडवलेले होते. ऋषिकेश याने आरडाओरडा केला म्हणून लोक जमले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र दुर्दैवाने दोघींचाही मृत्यू झालेला होता. पोलिसांनी तात्काळ कारभारी ज्ञानदेव लोंढे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.