ब्रह्मपुरी येथील अलंकार सिनेमागृहाला आग, लाखोंचे नुकसान आगीचे कारण अस्पष्ट सर्व साहित्य जळून खाक लाखोंचे नुकसान


ब्रह्मपुरी :-
स्थानिक अलंकार सिनेमागृह जळून बेचिराख झाले आहे. आगीत सिनेमागृह मधील सर्व साहित्य जळाल्याने लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. शहरात व तालुक्यात एकमेव अलंकार सिनेमागृह आरमोरी मार्गावर आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सिनेमा गृहाला आग लागून संपूर्ण सिनेमागृहातील साहित्य जळून खाक झाले. समोरील लोखंडी दार कुलूप लावून बंद करण्यात आले होते. आत जाण्यासाठी दुसरा मार्ग नव्हता त्यामुळे दुसरे दिवशी सकाळी दहा वाजताच्या सुमारास येथील कर्मचाऱ्यांनी दार उघडून आत प्रवेश केला असता सदर प्रकार निदर्शनात आला.
मशीन, पडदा, पडद्यामागील साऊंड, इलेक्ट्रिक साहित्य पूर्णतः जळून खाक झाल्याने मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान ही आग नेमकी कशी लागली हे अजून कळले नाही.