डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मृत शेतकऱ्याच्या कुटुंबालाही मदत

 
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार परिषद घेऊन काही घोषणा करुन शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करीत आहोत. बार्टीच्या ८६१ जणांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा शिंदेंनी केली. ८६१ जणांच्या फेलोशीपपोटी दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा खर्च होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


🕯️यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाँग मार्चदरम्यान मृत पावलेल्या पुंडलिक जाधव या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिल्याचं सांगितलं आहे. मृत पुंडलिक जाधव यांच्या कुटुंबियांना यावेळी मुख्यमंत्री ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

 पुढे बोलतांना मुख्यमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाविषयी भाष्य केलं. ते म्हणाले की, इंदू मीलमध्ये होणारं स्मारक हे जागतिक दर्जाचं होत आहे. आपण परदेशात जातो. परंतु परदेशातील लोक बघायला येतील, असं स्मारक इंदू मीलमध्ये उभा राहात असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं. यासह वंचित, पीडित घटकातील नागरीक हक्कांसापून, शिक्षणापासून दूर राहू नयेत, यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचं शिंदेंनी सांगितलं.

🙏🏻 *कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा...*