अनियंत्रित कार झाडावर आदळली; दोघांचा मृत्यूगोंदिया गोंदिया - बालाघाट मार्गावरील मुरपार शिवारात भरधाव अनियंत्रित कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला आदळली. या अपघातात चालकासह दोघाचा मृत्यू झाला. ही घटना १५ एप्रिलच्या सायंकाळी ७.३० वाजता सुमारासची आहे. कपिल शिवप्रसाद गोणगे (३०) रा. आवलाझरी जि. बालाघाट व राहुल विनोदकुमार बिसेन (२७) रा. खुर्शिपार जि. बालाघाट असे मृताचे नावे आहेत.सविस्तर असे की, बालाघाट जिल्ह्यात कंपनीत काम करीत होते. १५ एप्रिल रोजी दोघे जण कार क्र. एमपी - ०४ / सीएम-३०११ ने गोंदियाकडून बालाघाटकडे जात होते. कार चालक गोणगे याचा नियंत्रण सुटल्याने मुरपार गावशिवारात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर कार आदळली. या घटनेत कार चालक कपिल गोणगे व राहुल बिसेन या दोघांचा मृत्यू झाला. फिर्यादी पोहवा रूपेंद्र गौतम याच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.