गडचिरोली पोलिसांनी केली नक्षलवाद्यास अटक


दिनेश बनकर कार्यकारी संपादक


एटापल्ली: नक्षल दलम सोडून घरूनच नक्षली कारवाया करणाऱ्या २ लाख इनामी नक्षलवाद्यास गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून अटक करण्यात यश मिळवले आहे. साधू उर्फ काऱ्या उर्फ संजय नरोटे वय ३१ वर्षे, राहणार झारेवाडा तालुका एटापल्ली असे अटक झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.

साधू वर २३ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यात बारा चकमकी, आठ खून, दोन जाळपोळीच्या घटना व एक दरोडा याचा समावेश आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण दोन लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते. पोलिसांच्या या अटक कारवाई नंतर जानेवारी २०२२ पासून आज पर्यंत एकूण ६७ नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलीस दलाला यश आले आहे.