धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील कानेगावात गेल्या पाच वर्षापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती गावकऱ्यांकडून साजरी होवू दिली जात नाही. त्यामुळे या गावातील बौद्ध लोकांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनास सुरुवात केली आहे. या गावच्या आडमुठेपणाच्या धोरणाचा महाराष्ट्रातील विविध संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.