दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार, एक गंभीर

देवरी येथील घटना : जखमीवर उपचार सुरू

 देवरी : देवरी ते चिचगड मार्गावरील भाटिया पेट्रोलपंपासमोर दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात एकाचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. २५) रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात हितेश श्रीवास व मिर्जा अलीम बेग या दोन्ही युवकांचा मृत्यू झाला. झाला. तर मिर्जा अलीम बेगची पत्नी शाहील मिर्जा ही गंभीर जखमी झाली.

हितेश संतोष श्रीवास (२५, रा. परसटोला) हा आपल्या दुचाकीने देवरीच्या मार्केटकडे येत होता. दरम्यान, समोरून येत असलेला दुचाकीचालक मिर्जा अलीम बेग (३५, रा. बालाघाट) या दोघांचे आपल्या दुचाकीवरील संतुलन सुटल्याने

दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक दिली. यात हितेश श्रीवास याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मिर्जा अलीम बेग याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला 

दुचाकीवर बसलेली मिर्ज़ा अलीम बेग याची पत्नी शाहिल मिर्जा बेग ही गंभीर जखमी झाली. तिला प्राथमिक उपचाराकरिता देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच देवरी पोलिस घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करून याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.