पहिल्यांदाच इंदिरानगर येथील नुकताच झालेल्या पोलिस वाहण चालक,पोलिस शिपाई भरर्तीमध्ये या मंजुषा नैताम,गोविंदसिंग चौहान,शुभम चापले,ममता गावडे चार सुपुञाची निवड
दिं 06/04/2023
(युवा मराठा न्यूज ब्योरो चीफ सुरज गुंडमवार गडचिरोली)
गडचिरोली: गडचिरोली जिल्हा पोलिस दलात इंदिरानगर येथील पहिल्यांदाच चार युवक व युवती यांनी एकसाथ बाजी मारत इतिहास घडविला आहे.विशेष म्हणजे स्व:ताच्या मेहनतीने वाचनालयात अभ्यास करुन व मैदानी सराव करुन युवकांनी हे शिखर गाठले आहे.याच अनुषघांने माजी न. प.उपाध्यक्ष अनिल भाऊ कुनघाडकर यांनी त्या युवकांच्या व युवतीच्या घरी जाऊन सत्कार केले व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छां दिल्या.
विषेश म्हणजे चारही युवक व युवती यांच्या घरची परिस्थिती बिकट असुन त्यांचे आईवडील ऊनातानात घाम गाळून आपल्या मुलांना शिक्षण देऊन त्यांना नेहमी उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहित करीत आज त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू.
यावेळी स्वप्नील मडावी संचालक व मार्गदर्शक,मयुर कुनघाडकर,प्रमोद भांडेकर, सदानंद सुरनकर,प्रविन नैताम,बुरे,सांरग विरवार,गणेश मल्लेलवार,गूड्डू वैरागडे,,तुषार मडावी,बकुश पठाण, डेविड साहारे,राजू गेडाम,पंकज नैताम,गुड्डू गीरसावडे,कार्तिक विरवार यादी उपस्थित.