कुत्र्याने व्यक्तीचा प्रायव्हेट पार्टच तोडला; तरुण गंभीर, गावकऱ्यांनी श्वानाला दिली भयानक शिक्षा


चंदीगड : कुत्र्याच्या हल्ल्याची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका पिटबुल डॉगने एक युवकावर हल्ला केला. 30 वर्षीय युवकाचा जीव धोक्यात आला, कारण कुत्र्याने त्याच्या प्रायव्हेट पार्टला चावा घेतला होता. युवकाने आपला जीव वाचवण्यासाठी शेवटी कुत्र्याच्या तोंडात कापडाचा बोळा घातला. या युवकची प्रकृती सध्या गंभीर आहे. या घटनेनंतर लोकांनी या कुत्र्याला बदडून मारून टाकलं.


बिजना येथील रहिवासी करण गुरुवारी सकाळी आपल्या शेतात काम करत होता. त्याच्या शेतात मशीनखाली एक पिटबुल डॉग बसलेला होता. करण मशीनजवळ जाताच कुत्र्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टरांनी सांगितलं की, पिटबुलने तरुणाच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला होता. सुटकेसाठी खूप प्रयत्न करूनही पिटबुल तरुणाला सोडत नव्हता. त्यानंतर शेजारी पडलेलं कापड कुत्र्याच्या तोंडात टाकून तरुणाने आपला जीव वाचवला. मात्र कुत्र्यापासून वाचण्यासाठी त्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तरुण गंभीर जखमी झाला आहे.

त्या तरुणावर पिटबुलने हल्ला केल्यावर त्याचा आवाज आसपासच्या लोकांपर्यंत पोहोचला. त्यांनी जखमी तरुणाला घारुंडा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं, तिथे त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं. डॉक्टरांनी ताबडतोब त्याला कर्नाल येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला, जेणेकरून तिथे त्याची योग्य काळजी घेतली जाईल.

तरुणाच्या नातेवाईकांनी सांगितलं की, पिटबुल गेल्या एक आठवड्यापासून गावातील लोकांवर हल्ले करत असून एक दिवसापूर्वी आणखी एका गावकऱ्यावरही हल्ला केला होता. गावकरी घराबाहेर पडायला घाबरत होते. यावर सर्व गावकऱ्यांनी मिळून निर्णय घेत कुत्र्याला काठीने बेदम मारहाण केली. या प्रकरणाची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आणि पोलिसांनी कर्नाल येथील कल्पना चावला मेडिकल कॉलेज गाठलं, तिथे जखमी तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात आले. पोलीस याप्रकरणात आता कुत्र्याच्या मालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करतील.