भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हा परिषद शाळा कोजबी येथे साजरी

दिनेश बनकर कार्यकारी संपादक सुपर फास्ट बातमी



आरमोरी
तालुक्यापासून 20 किमी अंतरावर असलेल्या कोजबी येथे  
              जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ , भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोसबी येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.


             जयंतीचे औचित्य साधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्र व सामाजिक कार्यावर मान्यवरांकडून प्रकाश टाकण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे जयंती समारोहात सहभागी होऊन बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला. जयंती समारोहाच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून दिनेशजी बनकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कोसबी, प्रमुख अतिथी म्हणून रोहिदासजी सहारे, विश्वनाथ सोनटक्के सर, प्रशांत ठेंगरे सर यांची प्रामुख्याने उपस्थीती होती.



          कार्यक्रमाचे संचालन कु स्नेहा धोंगडे तर आभारप्रदर्शन साजन चहांदे या विद्यार्थ्याने मानले.