नवरा शारीरिक सुख देण्यास ‘ अकार्यक्षम ‘ , पुण्यातून महिला पोहचली नागपूरला


अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या पुण्यात समोर आलेले असून प्रकरणातील पीडित महिलाही नागपूरची रहिवासी आहे तर आरोपी हा पुण्यातील असल्याची माहिती आहे . आपला पती आपल्याला शारीरिक सुख देत नाही आणि सातत्याने मानसिक छळ करतो अशी तक्रार या महिलेने अजनी पोलीस ठाण्यात केलेली आहे.

पतीचे वय हे 37 वर्ष असून त्याच्या पत्नीचे वय 35 वर्षे आहे. पतीचा औषध विक्रीचा व्यवसाय असून त्याची पत्नी ही एका हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करते. 2020 मध्ये त्यांचे लग्न झालेले होते मात्र त्यानंतर पती हा सातत्याने पत्नीला लैंगिक सुख देत नव्हता त्यानंतर पत्नीने त्याला डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला आणि त्याने डॉक्टरांकडून अखेर उपचार करून घेण्यास सुरुवात केली.

काही दिवस अशा पद्धतीने गेल्यानंतर पती असलेल्या व्यक्तीने चक्क पीडित महिलेच्या भावाला फोन केला आणि तुझी बहीण मला शारीरिक सुख देत नाही अशी तक्रार त्याच्याकडे केली. तिच्या भावाने हा प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला आणि त्यानंतर आई-वडिलांनी मुलीला विचारले त्यावेळी तिने ‘ मी तयार आहे मात्र तोच मला लैंगिक सुख देण्यासाठी कार्यक्षम नाही ‘ असे आईला सांगितले.

ऑनलाइन पद्धतीने या पत्नीने अखेर शिक्षणाची तयारी सुरू केली त्यानंतर पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली आणि तिचा मानसिक छळ सुरू केला. दोन्ही कुटुंबातील सदस्यांची अखेर बैठक झाली त्यानंतर तोडगा निघाला नाही म्हणून ही पत्नी अखेर नागपूर इथे तिच्या माहेरी निघून गेली . महिलेच्या म्हणण्याप्रमाणे आरोपी पती याने ‘ त्याच्याकडून मी दागिने माहेरी घेऊन आलेले आहे ते मी परत करणार आहे सोबतच घटस्फोट झाल्यानंतर पोटगी घेणार नाही पतीच्या संपत्तीवर माझा कुठलाही अधिकार राहणार नाही ‘ असे प्रतिज्ञापत्र बनवले आणि त्यावर बळजबरीने सही करण्यास सांगितले.


प्रतिज्ञापत्रातील अटी वाचल्यानंतर आपण सही करण्यास नकार दिला त्यानंतर मार्च 2023 मध्ये ही महिला गुन्हे शाखेच्या भरोसा सेलमध्ये पोचली. भरोसा सेलकडून करण्यात आलेल्या मार्गदर्शनानंतर देखील तोडगा निघू शकला नाही त्यानंतर अखेर या महिलेने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली असून पोलिसांनी आरोपी पतीच्या विरोधात होण्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.