1) वसंत पाटील यांचा 50 कार्यकर्तेसंह भीम आर्मीत जाहीर प्रवेश : 2) वसंत पाटील भीम आर्मीच्या नरखेड काटोल विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती :: --------------------------------------
राजेंद्र बागडे
नागपूर विभागीय प्रतिनिधी ता.3
भीम आर्मी भारत एकता मिशन नागपूर संघटनेत भाई चंद्रशेखर आझाद यांच्या विचाराला व नेतृत्वाला प्रेरित होऊन नागपूर जिल्ह्यातील मोवाड, नरखेड,काटोल, कळमेश्वर व हिंगणा येथील अनेक तरुण तरुणींनी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अंकीत राऊत आणि जिल्हा उपाध्यक्ष पंकज जसूतकर यांच्या नेतृत्वात भीम आर्मी संघटनेत जाहीर प्रवेश घेतला. सर्व भीम आर्मीचे पदाधिकारी आणि नवनियुक्त सर्व मित्र परिवार यांच्याकडून वसंतभाऊ पाटिल, काटोल नरखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल कार्यकर्तेनी एकच जल्लोष करत अभिनंदन केले तर त्याच्यासह 50 कार्यकर्तेनी भीम आर्मीत प्रवेश घेतला. नरखेड काटोल विधानसभा क्षेत्रात अनेक शहरात, खेडेगावात, गाव तेथे भीम आर्मीची कार्यकरणी शाखा आपण तयार करू व एक जुटीने काम करू हाच उद्देश ठेवत पाटील यांना नरखेड काटोल विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली. भीम आर्मीचे कार्यकर्ते दीपक बागडे, रोशन गजभिये, पत्रकार राजेंद्र बागडे, निलेश तुमाने, सचिन ठाकुर, चांदखा पठान, हर्षल जैन,अक्षय गजभिये, रतन, तागडे, अनिल विसके, गौरव जैन, इन्द्र वल्के, शारदा गजभिये, सोनू गजभिये, ललीता ढोले, निकिता सिंगर, नीलू खडसे, मुकेश मडके.यांनी वसंत पाटील यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले आहे.