शेत शिवारात दुचाकीने जाणे पडले महागात


 लाखांदूर : रब्बी हंगामांतर्गत शेत शिवारात लागवडीखालील धानपिकाची पाहणी करण्यासाठी दुचाकीने शेत शिवारात गेलेल्या शेतकऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविल्याची घटना घडली. ही घटना १६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास लाखांदूर ते पवनी मार्गावरील पाहूनगाव शेत शिवारात घडली. दुचाकी मालक दादाजी रामचंद्र बनकर (५६) रा. पाहूनगाव यांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसात अज्ञात आरोपीच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहूनगाव शेत शिवारात निंदन काढणी सुरू असल्याने, ते दुपारच्या सुमारास मालकी हीरो होंडा सीडी ११० ड्रीम कंपनीच्या दुचाकी क्रमांक एम एच ३६ ए ई ९२५६ ने शेत शिवारात गेले होते. शेत शिवारात पोहोचल्यानंतर त्यांनी मालकी दुचाकी लाखांदूर ते पवनी मार्गालगत लॉक करून ठेवून शेतात गेले. शेतातील कामाची पाहणी केल्यानंतर दुचाकी उभी असलेल्या ठिकाणी पोहोचले असता, त्यांना दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र, दुचाकी आढळून न आल्याने तत्काळ लाखांदर पोलिस ठाणे गाठले,