मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटायला जात असलेल्या वडिलांचा भरधाव बोलेरो वाहनाने जोरदार धडक दिल्याने घटनास्थळी मृत्यू


गोंदिया : मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटायला जात असलेल्या वडिलांचा भरधाव बोलेरो वाहनाने जोरदार धडक दिल्याने घटनास्थळी मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. २३) दुपारी तिरोडा तालुक्यातील ग्राम पांजरा येथे घडली. नरेश बोपचे असे अपघातात ठार झालेल्या वडिलाचे, तर वंदना बोपचे असे अपघातात जखमी झालेल्या त्यांच्या पत्नीचे नाव आहे.

तिरोडा तालुक्यातील खूरखुडी नरेश फागुराम बोपचे हे आपल्या दुचाकी एमएच ३१
क्रमांक बीडी ७४२३ ने पत्नी वंदना बोपचेसह दुपारच्या दरम्यान आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका नातेवाइकांना वाटण्यासाठी खुरखुडीहून हायवे लागणाऱ्या ग्राम पांजरा बस स्टॉपजवळून मौजा बीर्सी - तिरोडाकडे

जात होते. दरम्यान, तुमसरहून बोलेरो मालवाहक क्रमांक एमएच 3५ के ४६५८ने त्यांना मागून धडक दिली. या अपघातात नरेश बोपचे हे घटनास्थळी ठार झाले, तर पत्नी वंदना बोपचे जखमी असून, त्यांना गोंदिया येथील शासकीय सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

तिरोडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास सहायक फौजदार शिवलाल धावडे सोबत अंबादे करीत आहेत.