गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली. पोलिसांकडून अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळणे सुरू आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका दीराने आपल्याच वहिनीवर बलात्कार केला आहे.
जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या दावरवाडी गावात ही संतापजनक घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिलेच्या पतीचं अपघाती निधन झाल्यानंतर तेराव्याच्याच दिवशीच हा संतापजनक प्रकार घडला आहे.
याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी Police) आरोपी चुलत दीरावर गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील दावरवाडी गावातील एका महिलेच्या पतीचे अपघाती निधन झाले.
महिलेच्या पतीच्या निधनानंतर त्याच्या तेराव्याचा कार्यक्रम आवरला होता. त्यानंतर आरामासाठी मृत व्यक्तीची पत्नी आपल्या चुलत सासूच्या घरी आरामासाठी थांबली होती. त्यावेळी महिलेच्या चुलत दीराने घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार (Crime News) केला.
दरम्यान, महिलेनं नकार देऊनही बळजबरीने चुलत दीराने बलात्कार केल्याने सदर महिलेनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरु असल्याचं सांगितलं आहे. पण, पतीच्या निधनानंतर अवघ्या तेराव्याच्या दिवशीच पत्नीवर हा प्रसंग ओढावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.