ओबीसी सुतार समाज नेत्यांनी समाजहितासाठी अज्ञातवासात न जाता जमिनीवर उतरणे गरजेचे आहे.





      देशात सर्वात मोठी संख्या असणाऱ्या ओबीसी समाजाचे राजकीय,शैक्षणिक आणि नोकरीचे आरक्षण काढून घेतल्यावर ही एकूण ओबीसी समाजात मोठी खळबळ अपेक्षित होती.पण ओबीसी समाजातील कोणत्या ही जातीने समाजात जाऊन याबाबत जनजागृती प्रबोधन केल्याचे फारसे दिसले नाही.राजकीय पक्षाचे गुलाम कार्यकर्ते आणि नेते अज्ञातवासात गेल्याचे दिसून आले. राज ठाकरे ने आवाज दिल्यावर गल्लीबोळातील ओबीसी समाजाचे तरुण रस्त्यावर उतरून खट्टयाळ खट आवाज काढतात.बाकीच्या वेळी त्यांची बुद्धी शेण खाते.समाजाचा स्वाभिमान नसणारे ओबीसी अनेक पक्षाचे वैचारिक,मानसिक गुलाम झाले आहेत.
     आजच्या घडीला 45 ते 50 लाखाच्या उच्च सुशिक्षित तरुणातील सुक्ष्म चिकित्सक मेल्याचे स्पष्टपणे दिसते.अज्ञान अंधश्रद्धा बाबत सुजाण ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रात कोणत्याच गोष्टींची कमतरता अजिबात जाणवत नाही. सुतार समाजात राज्यभरात सर्वगुण संपन्नता गुणवंता कोणती?.हे कोणालाच मोजता येत नाही.सुतार समाजात सामाजिक क्षेत्रात वैयक्तिक पातळीवर प्रगतीला अजिबात महत्व दिले जात नाही.हे अगोदर सर्वप्रथम मी सामाजिक दृष्टीने मुद्दामच समाजाला जाहिर पणे सांगतो. समाजहित कशात आहे हे जाहीर स्पष्ट करतो. ओबीसी सुतार समाजनेत्यांनी समाजहितासाठी अज्ञातवासात न जाता जमिनीवर उतरणे गरजेचे आहे.जनजागृती,समाज जागृती प्रबोधन करण्यासाठी समाजहिताचे महत्व लक्षात घेऊन सजग राहीले पाहिजे.हे दिसत नसल्यामुळे माझ्या सारख्या खेड्यातील अडानी आणि सामाजिक क्षेत्रातील कोणत्याही पदावर नसलेल्या कार्यकर्त्याला मांडावे लागते.
       आपापली ओबीसी सुतार समाजात जेवढी समाज किंमत असेल मागे मागे पुढे पुढे मागे करणारी काही बोटावर मोजता येतील अशी काही मोजक्याच संख्येने समजदार मंडळी जर असेल तर जेवढी समाज प्रतिष्ठा असेल, जेवढी समाजात क्षमता असेल, जेवढेच समाजाचे प्राबल्य असेल, जेवढी सामाजिक पत,ओबीसीसमाजात वजन असेल.त्यावरचा राजकीय दबाव निर्माण होईल.
     जेवढी समाजशक्ती असेल,जेवढी समाज ताकद असेल,जेवढे समाज प्रभुत्व असेल,जेवढे स्टार प्रचारक असतील जेवढे निष्ठावंत तळमळीचे समाज कार्यकर्ते समाजात जिवतोड मेहनत करून समाजाची संघटना एकजुठीने कार्यरत असतील.अन्यता एकना धड भारा भर चिंद्या असतील.आणि आज ओबीसी समाजात भारा भर चिंद्याचं जास्त दिसतात.
    ओबीसी सुतार समाजातील सामाजिक क्षेत्रातील अनुभवी,मुरब्बी,प्रख्यात परखडपणे पत्रकारिता करणारे मान्यता प्राप्त मुद्दे समजणारे मुद्दा सोडुन सोयीनुसार पळवाट न शोधणारे,सुशिक्षित उच्चशिक्षित,चाणाक्ष,चतुर,चिकित्सक बुद्धिप्रामाण्यवादी इथं शब्दफेक करणारे शब्दप्रयोग करून शब्दप्रामाण्यवादी नको असे दिग्गज धुरंधर,मातब्बर भाषेवर प्रभुत्व असलेले नेते कार्यकर्ते आज समाजात दिसत नाही.आणि असतील तर त्यांनी ओबीसी सुतार समाज नेत्यांनी समाजहिता साठी अज्ञातवासात न जाता जमिनीवर उतरणे गरजेचे आहे.
      ओबीसी सुतार समाज सन्माननीय पत्रकार बांधवांना बोलवा पत्रकार परिषद घ्या, पत्रकार,संपादक,समाजसेवक,विचारवंत बुद्धीजीवी बोलवा,या व्यतिरिक्त अजुनही काही अजब कला अस्तित्वात असतील तर त्या अजब गजब कलेचा इत्यादी सर्वांचा पुरेपुर, भरपूर योग्य वापर करा आणि ताबडतोब,झटपट,फटाफट,लगेच नकारात्मकता देणारे विचार झटकुन टाका.आणि सकारात्मक विचाराने आपापली सर्वच समाज यंत्रणा जलदगतीने, वायुच्या वेगाने,तुफान सुसाट वेगाने राज्यभरातील जिल्हा,तालुका गावागावात जाऊ द्या. सर्वच सोशल मीडियाचा पुरेपूर वारेमाप वापर करा आणि त्यासाठी ओबीसी सुतार समाज नेत्यांनी समाजहितासाठी अज्ञातवासात न जाता जमिनीवर उतरणे गरजेचे आहे.
      ओबीसी,संविधान जनगणना,संवैधानिक अधिकार,सत्ता संपत्ती ज्ञान इत्यादी बद्दल आपापल्या ज्ञानाचा ज्ञान भांडार खुला करा,ज्ञानाचा ज्ञान महासागर खुला करा.ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रात राज्यस्तरीय ओबीसी सुतार समाज जागृती मेळावा समाज आंदोलन होईल.ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रात सत्ता संपत्ती ज्ञान आणि संविधान, जनगणना बद्दल समाज जागृती निर्माण करणे,संवैधानिक अधिकार,राजकीय हिस्सेदारी,ओबीसी बद्दल तसेच अन्य विषयावर समाजात समाज प्रबोधनात्मक सामाजिक वैचारिक आणि नैतिक दृष्टीने जबाबदारी कोणाची?. यासाठी ओबीसी सुतार समाज नेत्यांनी समाजहितासाठी अज्ञातवासात न जाता जमिनीवर उतरणे गरजेचे आहे.
     अज्ञातवासामुळे ओबीसी सुतार समाजाचे सामाजिक क्षेत्रातील भलेमोठे नुकसान झाले आहे.ते भरून काढण्यासाठी ओबीसी सुतार समाज जमिनीवरील मैदानात ताकदीने उतराला पाहिजे.ओबीसी समाजात समाज प्रबोधनात्मक,जागृती करण्यासाठी ओबीसी सुतार समाज नेत्यांनी समाजहितासाठी अज्ञातवासात न जाता जमिनीवर उतरणे गरजेचे आहे.आणी ओबीसी सुतार समाजात नेतृत्व सिद्ध करा.
     ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील ओबीसी सुतार नेतृत्व आणी ओबीसी सुतार युवा नेतृत्व मान्यवरांच्या ओबीसी सुतार पथकाने सामाजिक दृष्टीने अज्ञानवासात जाऊ नये कारण आपले सामाजिक दृष्टीने अज्ञावासात जाणे समाजहिताचे अजिबात ठरणार नाही कारण ओबीसी सुतार समाजाला आपली आपल्या ज्ञान भांडार खुला करण्याची गरज आहे कारण आपणच तर ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील खऱ्या अर्थाने विकासात्मक योजना घेऊन समाजचे ओबीसी सुतार समाजाचे प्रबोधनात्मक महामेरू झाले पाहिजे.कोणीच आईच्या पोटातून नेता,कार्यकर्ता म्हणून जन्मा येत नाही.समाजात राहून अन्याय अत्याचार,अज्ञान अंधश्रद्धा यावर प्रहार कसे करावे ते शिकावे लागते.त्यानंतरचं ओळख निर्माण होते.मी कुठे पत्रकार,लेखक म्हणून प्रसिद्ध होतो.सोशल मिडीयावर मनाला जे जे चांगले वाईट वाटते,दिसते त्यावर लिहत राहिलो.एकमेव्र सत्यशोधक आंबेडकरी चळवळीतील कामगार नेते साहित्यिक आदरणीय सागर तायडे यांच्या मी संपर्कात आल्यामुळे सागर तायडे यांच्यामुळेच राज्यातील साठ वृत्तपत्रात माझ्या सारख्याचे लेख प्रसिद्ध होत आहेत.अशी मैत्रीभावना सत्यशोधक आंबेडकरी विचारांच्या बुद्धीजीवी माणसांत आहे. तीच मैत्रीभावना ओबीसी सुतार समाजातील बुद्धीजीवी माणसांत का नाही?.ती निर्माण करण्याची प्रेरणा मला मिळाली.म्हणूनच मी लिहतो ओबीसी सुतार समाज नेत्यांनी समाजहितासाठी अज्ञातवासात न जाता जमिनीवर उतरणे गरजेचे आहे.
        ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील सन्माननीय समाज नेतेगण आणि सन्माननीय युवा नेत्यांनी सुतार सामाजिक क्षेत्रात खऱ्या अर्थाने जमिनीवर सामाजिक वैचारिक व विकासात्मक चळवळ नेली पाहिजे.ओबीसी सुतार समाज जागृती अभियान जोरात राबविण्यासाठी तन,मन,धनाने जमिनीवर उतरणे गरजेचे आहे.त्यासाठी तोंडात साखर, पायाला भिंगरी आणि डोक्यावर बर्फ ठेवावे लागेल.तरच ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील नेते कार्यकर्ते साधारणतः दोन वर्षात ओबीसी सुतार समाजाचे सामाजिक क्षेत्रातील राज्यातील मान्यताप्राप्त नेते होतील.
         आपण नेहमी सोशल मीडियावर फोटोसह खाली अमुक अमुक समाज नेता, अमुक अमुक समाज नेतृत्व अशा प्रकारच्या बातम्या काही प्रमाणात सुबक सुंदर फोटोबाजी अर्थात हा सर्व प्रकार मग वधुवर परिचय मेळावा,लग्नसोहळा,सदिच्छा भेटीगाठी बद्दल असतो. पण ओबीसी समाजाचे सामाजिक,शैक्षणिक,रोजगार नोकरी आणि राजकीय आरक्षण गेल्याचे दुख किती लोकांना आहे.त्याची चिकित्सा कोणी करावी. सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरी,छोटे मोठे उद्योग सर्वसामान्य समाज बांधवांना व्यवसाय आणि रोजगार निर्मिती नसेल तर आर्थिकदृष्ट्या प्रगती कशी होईल."मांगीतल्याने मिळत नाही,संघर्षा शिवाय पर्याय नाही." हे ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याला नेत्याला माहितीच नाही.असे मला वाटते.५२ टक्के ओबीसी समाजाचे राज्यव्यापी आंदोलन उभे का राहत नाही.कारण "विहिरीत नाही,तर पोहऱ्यात कसे येणार?." मग मला अडाण्याला सांगा ओबीसी सुतार समाज नेत्यांनी समाजहितासाठी अज्ञातवासात न जाता जमिनीवर उतरणे गरजेचे आहे कि नाही.
       अज्ञातवासात या शब्दाला अनुसरून सुतार मनोगत व्यक्त केले आहे.अज्ञातवासामुळे ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील भलेमोठे नुकसान होईल.धडाकेबाज ओबीसी बद्दल सुतार समाजात समाज जागृती कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे.धडाकेबाज म्हणजे राज्यस्तरीय विचार करता किती हजार किती लाख ओबीसी सुतार समाज बांधवांची उपस्थिती असणे अपेक्षित आहे याचा ओबीसी सुतार समाजाने समजून घेणे आवश्यक एक अधिक एक दोन होतात की अकरा होतात.हे मधले चिन्ह काढून टाकल्यावर समजून घेता येईल.समाजाला चिन्हाचा उलगडा आणि वापर कसा कधी करावा हे समजून घेणे देणे यांची गरज आहे. आपण सर्वंच जण समजदार आहोत अर्थात ओबीसी सुतार समाजाच्या एकुण लोकसंख्या नुसार एकुण सरासरी उपस्थिती ताकद टक्केवारी असणे गरजेचे नाही का?.या करिता ओबीसी सुतार समाज नेत्यांनी समाजहितासाठी अज्ञातवासात न जाता जमिनीवर उतरणे गरजेचे आहे. 
       ओबीसी सुतार समाजाने "डोळे बंद करून द्या टाळी आणि घ्या टाळी तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू फुलांच्या माळा" हेच समाजकार्य नसते.सामाजिक क्षेत्रातील सत्यावर आधारित तर्कशुद्ध समाज तत्वाच्या आधारावर तसेच सामाजिक वैचारिक आणि नैतिक मूल्यांच्या आधारावर समाज संघटना उभी राहिली तर इतिहासात तिची नोंद होईल अन्यता ५२ टक्के ओबीसी जातीतील किती टक्के जागृत होते हा इतिहास लिहला जाईल.यासाठी मला कोणी 'मुर्ख' म्हटले तरी मी माझे मत मांडत राहतो,कदाचित ते चुकीचे असू शकते.पण ते कसे चुकीचे आहे हे मला कोणी छातीठोक पणे समजावून सांगितले पाहिजे हीच माझी इच्छाशक्ती आहे.म्हणूनच विनंती करतो बाबानो ओबीसी सुतार समाज नेत्यांनी समाजहितासाठी अज्ञातवासात न जाता जमिनीवर उतरणे गरजेचे आहे.एकच मैत्रीभावना समाजहित फक्त ओबीसी सुतार समाजहित
 जय संत भोजलिंग,जय ओबीसी.समाज जागृती अभियान अंतर्गत,जय संविधान
             प्रमोद सूर्यवंशी- ८६०५५६९५२१
             चिखली मातृतीर्थ बुलडाणा