महिलेचे हातपाय बांधले अन् मुद्देमाल घेऊन धूम ठोकली


गेल्या काही दिवसांपासून राज्यात चोरींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. घरात कुणी नसल्याचं फायदा घेत चोरटे लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पसार होत आहे. या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी मोहिम आखली आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील बारामती शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Breaking Marathi News)

बारामती शहरातील एका घरात शिरून चोरट्यांनी तब्बल ६३ लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिला घरात एकटी झोपली असल्याचं पाहून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांनी महिलेचे हातपाय बांधले. त्यानंतर दागिन्यांसह मुद्देमाल घेऊन धूम ठोकली

बारामती शहरातील (Baramati News) देवकाते नगर परिसरात रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे संपूर्ण बारामती शहरात घबराट पसरली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील देवकाते पार्क परिसरातील एका घरात महिला एकटीच होती. यावेळी अचानक चोरटे घरात घुसले. त्यांनी या महिलेचे हात पाय बांधून जबरी चोरी केली. प्राथमिक माहितीनुसार जमीन खरेदी करण्यासाठी या घरात ५५ लाख रुपयांची रोख रक्कम आणून ठेवली होती.