बापरे ! रस्त्यावरून धावतानाच पिकअपने घेतला पेट


सिरपूर - नेरी मार्गावरील घटना : 

तीन महिन्यांपूर्वीच घेतली पिकअप

पळसगांव (पि): चिमूर तालुक्यातील नेरी जवळ धावत्या पिकअपला आग लागल्याची घटना रविवारी दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान घडली. चालकाने प्रसंगावधान राखत वाहन थांबवून बाहेर पडल्याने सुदैवाने त्याचा जीव वाचला.

सिरपूर येथील राहुल निकोडे यांच्या मालकीचे पीकअप असून तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी विकत घेतले होते. नेरीवरून गावाकडे परत येत असताना सिरपूरजवळ दुपारी २.३० वाजता

धावत्या पिकअपला आग लागली. सहकाऱ्यांसह घटनास्थळी वेळीच चालकाच्या लक्षात आल्याने  त्यांनी  प्रसंगावधान राखून त्याने गाडी थांबवून बाहेर पडला. माञ आगीने रौद्र रूप धारण करत गाडीला कवेत घेतले. काही कळायच्या आत संपूर्ण वाहन जळून खाक झाले .काही कळायच्या आत संपूर्ण पिकअप जळून खाक झाले .


या वाहनाच्या माध्यमातून निकोडे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, पिकअप जळाल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणाचा तपास चिमूर पोलिस करत आहेत.