आदीवासी विकास संस्था देलनवाडीचे अध्यक्ष श्री. बारीकराव राजुजी पदा यांचे दुःखद निधन


आरमोरी : तालुक्यातील मांगदा येथील रहिवाशी असलेले आदीवासी विकास संस्था देलनवाडीचे अध्यक्ष श्री. बारीकराव राजुजी पदा वय 52 वर्ष यांचे आज अचानक सकाळी 11.30 वाजता दुःखद निधन झाले.

बारीकराव पदा हे आदिवासी विकास संस्था देलनवाडी येथे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते .आज घरीच त्यांना अचानक छातीत दुखून आल्याने घरीच कोसळून त्यांचे निधन झाले. ते अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. शेतकऱ्यांविषयी त्यांची आपुलकी होती . शेतकऱ्यांच्या असलेल्या समस्या ते तातडीने सोडवत असत.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई,वडील असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या अशा अचानक निघून जाण्याने पदा परिवारावर शोककळा पसरली आहे.

आज त्यांच्यावर सायंकाळी 5.00 वाजता मांगदा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

परिवारातर्फे आणि मित्र परिवारातर्फे त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली
💐💐💐💐💐💐💐💐