-बोरीचक येथील शेतकरी गजानन श्रावण खवले यांनी आपला बैल १४ रोजी जंगलात चारण्यासाठी सोडला होता. सायंकाळी बैल दिसेनासा झाल्याने त्यांनी शोध सुरू केला. या वेळी सिर्सी येथील जंगलातील बोरी- सावरगाव रस्त्यालगत १५ रोजी त्यांचा बैल मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या गळ्यातून रक्तस्त्राव झालेला दिसून आला. या घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला दिली. त्यानंतर
अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. दरम्यान, परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचे वास्तव्य असल्याची चर्चा होती. बैलाचा बळी घेतल्याने या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. वाघाचा बंदोबस्त करून शेतकरी खवले यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. या घटनेने परिसरात वाघाची भीती निर्माण झाली आहे.