कुरखेडा, 19 एप्रिल : कुरखेडा मार्गे वडसा कडे जाणाऱ्या
हायवा ट्रक ने ओव्हरटेक करण्याच्या नादात पुढे असलेल्या ट्रक्टरला धडक देत अपघात झाल्याची घटना बुधवार 19 एप्रिल रोजी सकाळी कुरखेडा-वडसा मार्गावर असलेल्या शंकरपुरच्या तलावानजीक घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार, कुरखेडा मार्गे एम एच 35 एजी 9134 क्रमांकाची मालवाहू ट्रक्टर धानाचे पोते वाहतूक करत होता.
दरम्यान शंकरपुर नजीकच्या तलावाजवळ मागेवुन येणाऱ्या हायवा ट्रक चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक्टरच्या समोरच्या चाकाला धडक दिली. यावेळी ट्रकचालकाचे नियंत्रण बिघडल्याने ट्रक थेट जंगलात शिरला तर ट्रक्टरची टाली पलटली असून ट्रॅक्टर क्षतिग्रस्त झाले. या अपघात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. घटनास्थळारून ट्रकचालक फरार झाल्याची माहिती असून काही काळ नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली आहे.