शासन यंत्रणेवर कायम दबाव निर्माण करण्यासाठी.

    विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले होते "शासन कर्ती जमात बना!." आणि शासन यंत्रणेवर कायम दबाव निर्माण करा.त्यासाठी १९२६ ला कामगारांच्या संघटनांना कायदेशीर मान्यता देऊन त्यांना विशिष्ट दर्जा मिळवून देण्यासाठी आणि अशा कामगार संघटनांच्या सभासदांना संरक्षण देण्यासाठी १९२६ साली कायदा तयार करण्यात आला होता. असोशिएश्न,फेडरेशन यांनी त्याला कोणी कसा हरताळ फसला यांचा कामगारांनी अभ्यास केला पाहिजे. आदरणीय जे.एस.पाटील साहेब त्यागी,ध्येयनिष्ठ कुशल संघटक आणि अभ्यासू नेतृत्वाखाली स्वतंत्र मजदूर युनियन ही एकमेव राष्ट्रीय ट्रेड युनियन जी देशपातळीवर २२ राज्यात आणि ४७ क्षेत्रात आघाडीवर संघटीत असंघटीत कामगार,कर्मचारी अधिकारी वर्गाचे नेतृत्व करीत आहे.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले होते "शासन कर्ती जमात बना!." आणि शासन यंत्रणेवर कायमस्वरूपी दबाव निर्माण करा.हेच बहुसंख्य मागासवर्गीय कामगार,कर्मचारी अधिकारी विसरले म्हणूनच मनुवादी राजकीय पक्ष आणि त्यांच्या कामगार संघटना सर्व यंत्रणेवर नियंत्रण ठेऊन काम करीत आहेत.हेच आपण विसरतो आणि त्यांना दोषी ठरवतो.
      आपण आंबेडकरी विचारांचे कामगार कर्मचारी अधिकारी असून सुद्धा आपणास कामगार कायद्याची माहिती नाही.म्हणूनच कर्मचारी आंबेडकरी विचारांची क्रांतिकारी युनियन वाढविण्या ऐवजी गोवळकरवादी,गांधीवादी,लोहियावादी,समाजवादी,मार्क्सवादी कम्युनिस्ट विचारांच्या युनियनला वार्षिक वर्गणी देऊन मोठे करतो.यांचा कर्मचारी अधिकारी वर्गाने विचार करावा. 2011 पासून कोणत्याही सरकारने नोकर भरती केलेली नाही. या काळात विविध डिपार्टमेंटचे 37 टक्के कर्मचारी रिटायर झाले. म्हणजेच शासकीय नोकऱ्यावर एक प्रकारची अघोषित बंदी आणली आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी कपात सुरू आहे.३६५ दिवसा पैकी २४० दिवस जे काम चालते ते काम कायमस्वरूपी समजल्या जाते.ते कंत्राटी पद्धतीने भरले नाही पाहिजे असा कायदेशीर अधि नियम असतांना तो बिनधास्तपणे मोडीत काढण्याचे धाडस सरकारने राष्ट्रीय ट्रेड युनियनचे सहकार्य असल्या शिवाय केले नाही.सर्वच राजकीय पक्षाच्या ट्रेड युनियन याविरोधात पोटतिडकीने लढल्या नाहीत.कारण कामगार प्रथम हिंदू आहेत,नंतर कामगार आहेत.म्हणूनच हिंदुत्ववादी सरकारच्या विरोधात, गोवळकरवादी,गांधीवादी,लोहियावादी,समाजवादी,कम्युनिस्ट मार्क्सवादी विचारधारेच्या एकूण बारा राष्ट्रीय ट्रेड युनियन सनदशीर मार्गाने लढल्या नाही.किंवा त्या विरोधात जागतिक पातळीवरील कामगार परिषेदत मध्ये गेल्या नाही.मग अशा वेळी महात्मा फुले,रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे, राजर्षी शाहू महाराज,पेरियार ई.व्ही. रामसामी नायकर आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांच्या कामगार,कर्मचाऱ्यांनी स्वतंत्र मजदूर युनियन या राष्ट्रीय ट्रेड युनियनच्या नेतृत्वामध्ये संघटित होणे काळाची गरज होती.ते का पूर्ण झाले नाही?.याचे आत्मचिंतन आवश्यक आहे.
       एकतर कामगार कायदे अधिनियम माहिती नसल्याचा अभाव होता. त्यामुळेच संघटना बांधणी करतांना कर्मचारी अधिकारी या मान्यताप्राप्त संघटना युनियनची भिती बाळगतात.म्हणूनच अडचणी जास्त सांगतात. त्यासाठी कामगार कायदे अधिनियम १९२६ ते २००८ पर्यंत जे जे कामगार कायदे अधिनियम आणि शासन निर्णय झाले आहेत यांचे अभ्यासपूर्ण माहिती एकत्रित करून माननीय नरेंद्र जारोंडे साहेब यांनी पुस्तिका तयार केली आहे.ते कामगार, कर्मचारी अधिकारी वर्गाने मन लावून वाचली तर अनेक समस्यांना खंभीरपणे लढण्याची हिंमत त्यांना मिळाल्या शिवाय राहणार नाही. कामगार चळवळीत काम करायचे असेल तर कार्यकर्ते,पदाधिकारी यांना कामगार कायदे अधिनियम माहिती असणे व प्रशिक्षित असणे आवश्यक आहे.आदरणीय जे.एस.पाटील साहेब त्यागी,ध्येयनिष्ठ कुशल संघटक आणि अभ्यासू नेतृत्वाखाली स्वतंत्र मजदूर युनियनला राष्ट्रीय पातळीवर मजबूत करण्यासाठी हे पुस्तीका लक्षवेधी आणि प्रेरणादायी ठरेल.२ ऑक्टोबर २०२२ रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर कामगार प्रशिक्षण केन्द्र नागपूर येथे स्वतंत्र मजदूर युनियन सोबत संलग्न असलेल्या कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.त्यावेळी सेवानिवृत्त अप्पर कामगार आयुक्त मा.विजयकांत पानबुडे साहेब यांनी कामगार कायदे या विषयावर सादर केलेल्या दस्तावेजानुसार मराठी भाषेत कायद्यांचे संकलन करून पुस्तक काढण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार खालील कामगार कायद्यांचे संकलन करण्यात आले आहे.याकरिता माननीय नरेंद्र जारोंडे साहेब यांनी जी मेहनत घेऊन पुस्तीका बनवली त्या बदल त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो.आणि शुभेच्छा देतो.कामगार कर्मचारी अधिकारी वर्गाने त्याचा अभ्यास करून वकृत्व नेतृत्व करण्यासाठी किर्याशील बनावे. "शासन कर्ती जमात बनावे !." आणि शासन यंत्रणेवर कायम दबाव निर्माण करावा.
आपला 
सागर रामभाऊ तायडे 
अध्यक्ष - स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.